न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

उमरगा पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय यांच्या कामकाजाबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कडून गौरवोदगार

Post-गणेश खबोले

 

उमरगा-प्रतिनिधी

विशेष पोलीस निरीक्षक परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर वीरेंद्र मिश्र यांची धाराशिव जिल्हा पोलीस दलाची वार्षीक तपासणी अनुषंगाने दि.26.03.2025 रोजी कार्यक्रम पार पडले.अनुषंगाने पोलीस ठाणे उमरगा येथे वार्षिक तपासणी निमित्त भेट देवून पो.स्टे.उमरगा येथील कामकाजाची पाहणी केली. वीरेंद्र मिश्र (विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर) यांनी मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे 100 दिवसीय कृती आराखडाच्या अनुषंगाने अंमलबजाणी संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करुन जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार,पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे उमरगा अश्विनी भोसले यांच्यासह येथील अधिकारी व अमंलदार यांनी उमरगा पोलीस ठाणे परीसराची व इमारतीची स्वच्छता, सुशोभीकरण करून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोलीस ठाणे उमरगा येथे येणाऱ्या नागरिकासाठी व पोलीस अंमलदार यांचे करीता आ.रो. प्लान्ट, बसवून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली.पोलीस स्टेशन परिसरातील सौंदर्यकरण या अंतर्गत उमरगा पोलीस ठाणे यांनी दगडावर केलेले कातळ चित्रे,चाटु वरील पेटींग,लाकडी ठोकळ्यांची केलेली बैठक व्यवस्था व सेल्फी पॉईट असे बदल करण्यात आले. तसेच नागरिकांच्या सोयीसुविधा करीता अभ्यागत कक्ष, पोलीस ठाणे उमरगा व उप विभागीय अधिकारी उमरगा येथे दर्शनीय भागावर सुचना फलक लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनच्या कामकाजाचे अनुषंगाने मुद्देमाल कक्ष, शस्त्र व दारुगोळा, कैश मोहरर, कार्डम मोहरर, यांच्या कामकाजाची व अभिलेख, मुद्देमाल मांडणी व अ,ब, रेकॉर्डची वर्गवारी करून जुने रेकॉर्ड नाश करणे, बेवारस वाहनांची निर्गती करण्यात आली. पोलीस ठाणे येथील गुन्हे निर्गती, गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण व अर्ज निर्गती, गुन्हे प्रतिबंध, व अभिलेख अदयावत करणे करीता पोलीस ठाणे येथील अधिकारी व अमलदार यांनी केलेले प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद होते. असे विरेंद्र मिश्र (विशेष पोलीस निरीक्षक छत्रपती संभाजीनगर) यांनी घेतलेल्या अधिकारी व अंमलदार यांच्या सुसंवाद कार्यक्रमात बोलताना उमरगा पोलीस स्टेशन हे एक आदर्श पोलीस स्टेशन असुन उमरगा येथे एक आल्हादायक वातावरण निर्माण झाले असून जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी पो.ठाणे यांनी भेटी देऊन पहाणी करून आपण ही आपल्या ठाण्यात असा उपक्रम राबवावा असे सुचित केले.

तसेच विरेंद्र मिश्र, (विशेष पोलीस निरीक्षक छत्रपती संभाजीनगर)यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय उमरगा येथे तपासणी दरम्यान सदर कार्यालयाचा व पिंक पथकाचा आढावा घेतला. सदर ठिकाणी परिसराची पाहणी करुन नविन बोरवेल व वृक्षसंर्वाधनासाठी केलेल्या ड्रीप इरिगेशन सिस्टम याचे विशेष कौतुक केले. मा.मुख्यमंत्री महोदय यांच्या 100 दिवसीय कृती आराखड्याची अंमलबजावणी करुन उमरगा पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय उमरगा माचा कायापालट केला, उमरगा पोलीस स्टेशन येथील स्वच्छता व सौंदर्यकरणाबाबत तालुक्यातही चर्चा होत असुन लोक पोलीस स्टेोशन बघण्यासाठी व फोटो काढण्यासाठी येत आहेत अशा शब्दसुमनांनी पोलीस ठाणे उमरगा वैचील कामकाजा बद्दल व झालेल्या बदलाबद्दल मा. विरेंद्र मिश्र, विशेष पोलीस निरीक्षक, छत्रपती संभाजीनगर, यांनी स्वतः सेल्फी पॉईट येथे फोटो काढून घेवून पोलीस स्टेशन येथील वातावरण बघुन मनात एक सकारात्मक उर्जा घेवून जात आहे असे गौरवोदगार काढले

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे