वागदरी येथे राष्ट्रीय सेवायोजना शिबीर सामाजिक उपक्रमा बरोबरच रंगले भजन प्रवचन व किर्तनात : ग्रामस्थाना मिळते प्रबोधनपर विचारांची मेजवानी

वागदरी येथे राष्ट्रीय सेवायोजना शिबीर सामाजिक उपक्रमा बरोबरच रंगले भजन प्रवचन व किर्तनात : ग्रामस्थाना मिळते प्रबोधनपर विचारांची मेजवानी
नळदुर्ग /न्यूज सिक्सर
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१८ जानेवारी पासून वागदरी ता.तुळजापूर येथे सुरु असलेले सात दिवशीय निवाशी राष्ट्रीय सेवा योजना शिबिर हे तिसऱ्या दिवशी श्रमदानातून ग्रामस्वच्छता, डोळे व दंत तपासणी शिबीर, आदी सामाजिक उपक्रमा बरोबरबरच भजन प्रवचन व किर्तनात रंगले.यामुळे येथील ग्रामस्थाना प्रबोधनपर विचारांची मेजवानी मिळते आहे.
दि.२० जानेवारी २०२३ रोजी सकाळी शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी एक दोन तास श्रमदानातून ग्रामस्वच्छता केली व सकाळी ११ पासून ग्रामस्था करिता डोळे तपासणी व दंत तपासणी शिबिराला सुरुवात करण्यात आली या शिबिरात ९० रुग्णांची डोळे तपासणी तर ३८ रुग्णांची दंत तपासणी करून प्रथमोपचार व आरोग्य सल्ला देण्यात आला. यावेळी उद्योजक सुनिल गर्जे,रोटरी आय हाँस्पिटल उस्मानाबादचे शिवरुद्र इसाके यांचा विशेष सहभाग नोंदवला.
तर सायंकाळी ६.०० वा.विद्यार्थीनी कुमारी नम्रता नकाते यांचे प्रवचन झाले दरम्यान श्री श्री रविशंकर यांच्या शिष्यांनी शिबिराला भेट देवून मार्गदर्शन केले. तसेच संध्याकाळी ९.०० वा.विद्यार्थी किर्तनकार अकाश पाटील यांचे संत तुकाराम महाराज यांच्या एका अभंगाच्या चरणावर भारदस्त किर्तन झाले. एकंदरीत हे शिबीर सामाजिक उपक्रमा बरोबरच प्रवचन भजन व किर्तनात रंगले.
यावेळी डॉ. सुभाष राठोड, डॉ. निलेश शेरे,उपसरपंच मिनाक्षी बिराजदार,रामसिंग परिहार, प्रमोद सोमोसे,राजकुमार पवार सह श्री संत भवानसिंग महाराज भजनी मंडळाचे सर्व सदस्य ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.