नव मतदारानी जागरूक राहणे महत्त्वाचेआहे-डॉ. महेश मोटे

नव मतदारानी जागरूक राहणे महत्त्वाचेआहे-डॉ. महेश मोटे
नळदुर्ग /न्यूज सिक्सर
लोकशाही प्रगल्भ करायची असेल तर नव मतदारानी अत्यंत जागरूक राहणे महत्त्वाचे आहे.
कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष वार्षिक शिबिर मौजे वागदारी या ठिकाणी संपन्न होत आहे. दिनांक 22 जानेवारी 2त्र023 रोजी दुपारच्या सत्रामध्ये 3.00 वाजता डॉ. महेश मोटे,श्री माधवराव पाटील महाविद्यालय मुरूम यांचे नव मतदार जनजागृती या विषयावरती व्याख्यान आयोजित केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच दत्तात्रय सुरवसे उपस्थित होते.
भारतीय लोकशाही प्रगल्भ करायची असेल तर मतदाराने जागरूक राहणे गरजेचे आहे तरच आपल्या भारतीय लोकशाहीची वाटचाल यशस्वी होऊ असे मत डॉ.महेश मोटे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमांमध्ये प्रा.पांडुरंग पोळे यांनीही लोकशाहीच्या जडणघडणीमध्ये मतदारांची भूमिका महत्त्वाची असते अशा प्रकारचे मत व्यक्त केले. प्रा नेताजी जाधव यांनी नव मतदाराची लोकशाही मधील भूमिका कशी आहे यावरून त्या लोकशाहीचे भवितव्य निश्चित होते असे मत व्यक्त केले.या कार्यक्रमाला प्रा. मोतीराम पवार, डॉ सुभाष राठोड,डॉ.अतिश तिडके, डॉ.सुभाष जोगदंडे, प्रा. प्रशांत घाडगे, श्री योगेश पांचाळ श्री अमोल कटके श्री मनोज हावळे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. निलेश शेरे, डॉ गजानन चिंचडवाड, डॉ.अशोक कांबळे, डॉ. सचिन देवद्वारे, डॉ संतोष पवार, प्रा नितीन बिराजदार प्रा. एल आय शेख, श्री माणिक राठोड श्री दिनेश पुदाले, श्री.बाबा कांबळे भागिनाथ बनसोड, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, गावातील ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निलेश शेरे तर आभार प्रा गजानन चिंचडवाड यांनी मानले.