
तुळजापूर -प्रतिनिधी
दि.०८ आक्टोबर २०२४ रोजी अश्विन शुध्द ॥५॥ जेष्ठा वार मंगळवार या दिवशी देविची दैनंदिन अभिषेक पुजेनंतर ही विशेष मुरली अलंकार पुजा पुर्वापार परंपरेनुसार भोपे पुजारी सचिन कदम,अतुल मलबा,विनोद सोंजी,समाधान कदम,यांच्याकडून मांडली गेली. महिषाशूरासी देविने नऊ दिवस अविरत पणे युध्द खेळून त्याला ठार केले.दैत्याच्या छळा पासून देविने ऋषीमुनी,देवदेवतांना मुक्त केले.यावेळी देविला श्रीकृष्णाने आपली मुरली अर्पण केली.श्री तुळजा भवानी मातेनीं ती मुरली वाजवून भयमुक्त झालेले वातावरण पुर्वरत पणे करून स्वर्ग प्राप्तीचा आनंद देवता व भक्तगणास मिळवून दिला याचे प्रतिक म्हणून ही विशेष मुरली अलंकार पुजा प्रतिवर्षी नवरात्र मध्ये मांडली जात असते अशी माहिती भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी दिली.