
लोहारा- प्रतिनिधी
विज्ञानाने अनेक क्रांतिकारी शोध लावल्यामुळे मानवी जीवन सुसह्य झाले आहे त्यामुळे मानवाने विविध क्षेत्रात क्रांती केली आहे. परंतु विज्ञानाच्या शोधाचा दुरुपयोग केला तर विनाश अटळ आहे. त्यामुळे विज्ञानाकडे सकारात्मक दृष्टीने पहाणे आवश्यक असल्याचे मत आमदार ज्ञानराज चौगुले यांनी हराळी येथील ज्ञानप्रबोधिनी शैक्षणिक संकुलात धाराशिव विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीने आयोजित विज्ञान शिक्षकांच्या गुणगौरव सोहळ्यात व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ सी व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संकुलाचे केंद्र संचालक अभिजित कापरे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शरण बसवराज पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, दिपक भैया जवळगे, मंडळाचे जिल्हाध्यक्ष मा रविंद्र स्वामी सर, जिल्हा उपाध्यक्ष रामकिशन गायकवाड , जगन पाटील, बळीराम सुरवसे, विलास भगत, गटशिक्षणाधिकारी सुभाष चव्हाण, मंडळाचे कार्याध्यक्ष किशोर पवार, विस्तार अधिकारी संतोष माळी, तालुकाध्यक्ष विनायक बगले, उपस्थित होते.
पुढे बोलताना चौगुले म्हणाले की अणु आणि अणुचया कक्षेत असणार्या इलेक्ट्रॉनचा शोध लागला आणि विद्युत क्षेत्रात क्रांती झाली. या क्रांतीने मानवी जीवनमान उंचावले. परंतु याच अणुचा दुरुपयोग केला तर बॉम्ब तयार होतो आणि त्यामुळे सजिवांचा विध्वंस होतो. त्यामुळे विज्ञानाने लावलेल्या प्रत्येक शोधांकडे सकारात्मक पाहून सकारात्मकच उपयोग करण्याचा त्यांनी अवाहन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजित साळुंके, राम शेळके, पल्लवी ठोकरे, संतोष येवले यांनी परीश्रम घेतले तर
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र स्वामी यांनी केले, सुत्रसंचालन नागनाथ कुलकर्णी व आभार रामकृष्ण गायकवाड यांनी मानले.
यांचा झाला सन्मान
परमेश्वर पालकर, लक्ष्मण पाटील, रमेश चेंडकाळे, गोपाळ कुलकर्णी, सुधाकर पुजारी, संजय पोतदार, संगीता पठाडे, विजयकुमार देशमाने, विश्वनाथ गर्जे, हरी शेके, सुहासिनी जाधव, विनोद गायकवाड, बळीराम खांडेकर, शुभांगी नलावडे, संजय कदम या शिक्षकांचा विज्ञान विषयात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ऋणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.