न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

खुदावाडीत रक्तदान शिबिर उत्साहात,५७ रक्तदात्याने केले रक्तदान

Post-गणेश खबोले

———————-
खुदावाडी (सतीश राठोड ) :- तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथे भास्कर व्हलदुरे मित्र परिवाराच्या वतिने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या शिबिरास ग्रामस्थांचा दांडगा प्रतिसाद मिळाला असून ५७ रक्तदात्यांनी रक्तदान केले .
भास्कर व्हलदुरे हे ग्रामपंचायत खुदावाडी येथील लिपिक म्हणून काम करतात . त्यांनी गावातील सार्वजनिक कार्यक्रमात नेहमी सहभाग नोंदवतात . त्यांच्या एकंदरीत कार्याची दखल घेत भास्कर व्हलदुरे यांचा मित्रपरिवाराकडून अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने रक्तदान शिबिर घेण्यात आले .याप्रसंगी येथील समाजसेवक डॉ सिद्रामप्पा खजुरे , सरपंच श्रीमती सरोजनीताई रेवणसिद्ध कबाडे, चेअरमन अमोल नरवडे , माजी सरपंच रेवणसिद्ध स्वामी, शरणाप्पा कबाडे, अमर नरवडे , नागनाथ दादा बोंगरगे, महादेव सालगे,तुकाराम बोंगरगे , राम जवळगे,गंगाधर चिंचोले, उमाशंकर चिंचोले , दिलीप सालेगावे , सावंत पवार,सुधीर राठोड, महेश्वर बोंगरगे, संगमेश्वर पाटील, सोमा कापसे, अनंत अहंकारी,गुरुनाथ बडदाळे,नागनाथ खंदारे , बडाप्पा मोळगडे,ओंकार कबाडे, स्वामिनाथ सालगे, आण्णू बोंगरगे,शिवराज कबाडे,निसर्ग सालेगावे,धनराज सालगे,विवेक जवळगे,प्रतीक कापसे,महेश जवळगे,रविराज जवळगे,गणेश जवळगे,गणेश सालगे,नागेश बिराजदार,सागर कबाडे,शाम खजुरे,गणेश धबाले,दयानंद शेरिकर,राहुल सगट, शांतेश्वर बोंगरगे,,गंगाधर बडदाळे,महेश वाघमारे,समाधान चिंचोले,विशू बोंगरगे, ज्ञानेश्वर पांचाळ,सोमनाथ सांगवे,आप्पादादा मुळे,नागनाथ कालुंके,बापू सूरवसे,भरत गुळवे,परमेश्वर सगट ,रवी खजूरे, तुषार करके,पवन कापसे,गणेश राठोड,प्रभाकर जाधव, ज्योतिराम काकडे,जगदीश शंकरशेट्टी सह भास्कर व्हलदुरे यांचे मित्रपरिवार उपस्थित होते . अभिष्टचिंतन सोहळ्यात भास्कर व्हलदुरे यांचा मित्रपरिवाराने सन्मान केला .
रक्तदान शिबिरात डॉ हेडगेवार रक्तपेढी संस्था सोलापूर येथील डॉक्टरांनी काम पाहीले .रक्तदान शिबिर यशस्वितेसाठी ग्रामस्थ मित्रपरिवारानी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे