न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

माजी विद्यार्थ्यांनी २६ वर्षानंतरच्या जुन्या आठवणींना दिला उजाळा

Post-गणेश खबोले

 

 

मुरूम(प्रतिनिधी) : येथील प्रतिभा निकेतन विद्यालयात इयत्ता १० वी च्या १९९७-९८ बॅचच्या विद्यार्थ्यांनी स्नेह मेळावा व गुरुवर्यांचा गौरव सोहळा रविवारी (ता. ३) रोजी विद्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य करबसप्पा ब्याळे होते. यावेळी उपमुख्यध्यापक उल्हास घुरघुरे, पर्यवेक्षक विवेकानंद परसाळगे, बालाजी बिदे, माजी मुख्याध्यापक सच्चिदानंद अंबर, डी. के. शेळके, कांत हुलसुरे, काशिनाथ मिरगाळे, प्रविण गायकवाड, प्रा. डॉ. केशव कुलकर्णी, बाबुराव जाधव, प्रल्हाद सगर, रमेश अष्टगी, तुकाराम उंबरे, शिवशरण तांबडे, मंगल शिंदे, प्रल्हाद काळे, चंद्रशेखर कोराळे, ज्ञानेश्वर वाघमारे, दत्ता मुदकण्णा, चंद्रशेखर चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. २६ वर्षांनी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा शाळा भरवून गुरुवर्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले. विद्यार्थ्यांनी छडीचा मार खाऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. एकमेकांच्या हातात हात देऊन, गळाभेट घेऊन एकमेकांची जीवनाबद्दल चर्चा करत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन, द्वीपप्रज्वलन व चैतन्यमूर्ती शिक्षणमहर्षी माधवराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. गुरू ब्रह्म गुरू विष्णू गुरू देवो महेश्वरा गुरू साक्षात परब्रम्हां तसमे श्री गुरुवे नमः ही प्रार्थना म्हणून गुरुवर्यांना नमण करून दिवगंत गुरुजन व मित्रांना श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी डॉ. सुनिल हुलसुरे, संतोष अष्टगी, पंडित मुदकण्णा, शरणय्या स्वामी आदींनी मनोगतातून आठवणींना उजाळा देत शालेय जीवनातील विविध विषयाच्या शिक्षकांबद्दलचे अनुभव, गुरुवर्यांनी शिकवलेल्या ज्ञानामुळेच आम्ही घडलो, सुप्रिया कौलकर यांनी कवितेतून भावना व्यक्त केली. यावेळी सच्चिदानंद अंबर, उल्हास घुरघुरे, कांत हुलसुरे, प्रल्हाद काळे आदींनी मार्गदर्शन करताना आजही आम्ही घडवलेले विद्यार्थी आमच्या आठवण जपून ठेवून आमचा सन्मान करतात हीच गुरुदक्षिणा असल्याचे मत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात प्रा. ब्याळे म्हणाले की, विद्यार्थ्यांना घडवणे हे शिक्षकाचे कर्तव्यच असल्याचे मत व्यक्त केले. देश सेवेतून सेवानिवृत्त झालेले माजी विद्यार्थी जाधव यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांकडून शाळेस भेट म्हणून लोखंडी कपाट दिले. नागेश हुलसुरे, अरुण हमीने, चंद्रकात शेंडगे, आस्तिक स्वामी, संतोष अंतरेड्डी, संजय आळंगे, विश्वनाथ राठोड, संतोष हंबीरे, सिद्धप्पा सोनटक्के, भीमाशंकर ब्याळे, नीरज ब्याळे, विनोद महामुनी, बसवराज कलशेट्टी, गिरीश अष्टगी, रजनीकांत वाघ, प्रशांत स्वामी, दिनेश माळी, राघवेंद्र कुलकर्णी, गणेश बडुरे, विजयकुमार बिराजदार, सिद्राम अष्टेकर, रमेश टेकाळे, काशिनाथ गारटे, सुनिल खंडागळे, ईश्वरचंद्र अंबर, सविता स्वामी, रेखा स्वामी, स्मिता जाधव, संजीवनी क्षीरसागर, माधुरी डंके, सुरेखा स्वामी, दीपाली कौलकर, अश्विनी शिंदे, अमृता वरनाळे आदींनी पुढाकार घेतला. डॉ. रामलिंग पुराणे यांनी गीताच्या माध्यमातून प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका वाकळे व पल्लवी शिंदे तर आभार सोनाली शेळके यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे