मार्डी येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती अध्यक्षपदी उत्तम भालेराव
Post-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी मार्डी ता.लोहारा च्या अध्यक्षपदी अध्यक्षपदी उत्तम भालेराव,उपाध्यक्षपदी किशोर भालेराव, सचिव ज्ञानेश्वर भालेराव, खजिनदार देविदास मस्के यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
दि.४ रोजी मार्डी येथील भीम नगर मध्ये समाज बांधवांची बैठक घेण्यात आली त्यावेळी या निवडी करण्यात आल्या. उर्वरित कार्यकारिणीत सल्लागार लिंबराज दुपारगुडे,उपाध्यक्ष सिद्धार्थ दुपारगुडे,भीम ज्योत तरुण मंडळ लेझीम संघ मार्गदर्शक मनोज भालेराव शंकर भालेराव,प्रल्हाद मस्के,गुलाब भालेराव,शिवा मस्के, अंबादास भालेराव,गणेश भालेराव,नागनाथ भालेराव, हनुमंत मस्के,अरुण भालेराव,सोमनाथ मिसाळ,मोहन मस्के, कलप्पा दुपारगुडे बाबू मस्के अभिमान भालेराव सुग्रीव भालेराव ,सहसचिव अशोक मस्के उपस्थित होते.यावेळी लेझीम संघाच्या अध्यक्ष पदी शुभम मस्के उपाध्यक्षपदी अनिकेत भालेराव, सचिव समाधान मस्के अनुज भालेराव साहिल भालेराव आशुतोष भालेराव आदर्श भालेराव महेंद्र भालेराव आदींच्या निवडी करण्यात आल्या.