आगामी काळात साजऱ्या होणाऱ्या रमजान महिना व सण – उत्सवा निमीत्त बैठकीचे आयोजन

आगामी काळात साजऱ्या होणाऱ्या रमजान महिना व सण – उत्सवा निमीत्त बैठकीचे आयोजन
धाराशिव /न्यूज सिक्सर
आगामी काळात साजरा होणाऱ्या रमजान महिना, सण- उत्सव, श्रीराम नवमी, शिवजयंती मिरवणूक पार्श्वभुमीवर पोलीस अधीक्षक कार्यालय सभागृह येथे मा.पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी यांचे अध्यक्षतेखाली दि. 28.03.2023 रोजी शांतता कमिटीचे सदस्य ,पदाधिकारी तसेच बेबंळी गावातील ग्रामस्थ यांची शांतता कमिटी बैठक घेण्यात आली. सदर बैठकीमध्ये मा. पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी यांनी रमजान महिना सण- उत्सव, श्रीराम नवमी, शिवजयंती मिरवणूक अनुषंगाने सर्व गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी गावकऱ्यांनी ही त्यांचे मनोगत व्यक्त केले. यावेळी बेबंळी पोलस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शेंडगे, नवनियुक्त प्रभारी अधिकारी सपोनि योगेश शिंदे, बेबंळी गावाचे सरपंच नितीन इंगळे, पंचायत समितीचे माझी उपसभापती सत्तार शेख, ग्रामपंचायत सदस्य मोहन खापरे, अनिल नळेगावकर, विद्या माने, नवाब पठाण, सिद्दीकी बावडीवाले,ग्रामपंचायतीचे माझी सदस्य सुशील कुमार माने, सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती बेंबळी चे अध्यक्ष दिपक वाघे, उपध्याक्ष विष्णू बागल व इतर सदस्य , मोईन पठाण, सलमान शेख, संतोष आगलावे इत्यादी हजर होते.