शांत, सय्यमी, हुशार प्रसंगी आक्रमक नेतृत्व म्हणजेच- सुनील चव्हाण

शांत, सय्यमी, हुशार प्रसंगी आक्रमक नेतृत्व म्हणजेच- सुनील चव्हाण
आज सोनियाचा दिनू, अणदूरचे सुपुत्र युवा नेते, सुनील चव्हाण यांचा वाढदिवस, तुळजापूर तालुक्याचे 5 वेळा आमदार ,नामदार असलेले मधुकरराव चव्हाण यांचे सुपुत्र सुनील चव्हाण हे वडिलांच्या पायावर पाय ठेऊन तुळजापूर तालुक्याचा विकास कसा करता येईल यासाठी अहोरात्र धडपडणारे, युवकांमध्ये कमालीचे लोकप्रिय असणारे,सुनील चव्हाण हे संपूर्ण तुळजापूर तालुक्यात लोकप्रिय आहेत. अल्पावधीतच शेतकर्यांची राजधानी असलेला तुळजाभवानी कारखाना गोकुळ शुगरच्या मदतीने चालू करून तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला. शांत, सय्यमी, हुशार प्रसंगी आक्रमक नेतृत्व म्हणजेच सुनील चव्हाण होत. राजकारण, समाजकारण याचे बाळकडू घरातूनच मिळाल्यामुळे युवकांचा संग्रह करणे, गोरगरीब, पीडित, वंचित लोकांची सेवा करणे त्यांच्या अडीअडचणी सोडवणे हा त्यांचा आवडता छंद असून, आज तालुक्यातील प्रत्येक गावात त्यांना मानणारा युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, त्यांच्या कार्याची दखल घेऊन प्रदेश काँग्रेस ने त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिवपदी त्यांची निवड केली, तसेच ते धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेवर संचालक म्हणून पण ते उत्तम काम करीत आहेत, जिद्द, चिकाटी, मेहनत या जोरावर त्यांनी यश संपादन केले,असा हा सर्वपक्षीय मित्र असणारा तुळजापूरच्या राजकारणातील उगवता तारा, लोकांना हवंहवंसं वाटणार नेतृत्व म्हणजेच सुनील चव्हाण होय, सहकारी तत्वावर लोकांचा विकास करण्याचे फार मोठे कसब त्यांच्याकडे असून भविष्य काळात हे नेतृत्व खूप पुढे जाणार हे निश्चित.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव, डीसीसी बँकेचे संचालक, कुलस्वामिनी सुत मीलचे चेअरमन, मधुकरराव चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष, तुळजाभवानी कारखान्याचे चेअरमन, खंडोबा पणन संस्था, शैक्षणिक संस्था अध्यक्ष अशा विविध पदावर सध्या ते काम करतात, राजकारणाचा वापर हा विकासासाठी करणारे, गोरगरिबांच्या विकास त्यातून साधणारे हे व्यक्तिमत्व संपूर्ण तालुक्यातील गावागावात प्रसिद्ध आहे, अनेक कटू प्रसंग त्यांच्या जीवनात आले. पण त्यांनी ते पचवले, सदैव लोकांच्या कामासाठी तत्पर असणारे हे नेतृत्व बहरत असून भावी,काळात मोठी भरारी घेणार हे निश्चित. आज त्यांच्या नेतृत्वात 10 वर्षांपासून बंद असणारा तुळजाभवानी साखर कारखाना गोकुळ शुगर च्या सहकार्यातून चालू असून,या वर्षी अनेक नैसर्गिक संकटे आली तरीही हा कारखाना त्यांनी जिद्दीने चालवून दाखवला आहे.
आहे त्या मशीनरीला, रिपेयर करून, जुने कर्मचारी,अधिकारी सोबत घेऊन त्यांनी हे काम करून तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांना फार मोठा दिलासा दिला आहे, पुढील वर्षी जवळपास 3.5लाख टन उसाचे गाळप करून 50 लाख लिटर स्पिरिट तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, ते तडीस नेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. हजारो मजुरांच्या हाताला काम, कारखान्यावरील सर्वच व्यवहार वाढवणार्या या प्रकल्पामुळे ऊस उत्पादक शेतकरी सुखावला आहे. संपूर्ण तालुक्याचे अर्थचक्र गतिमान झाले आहे, अशा या लोकांच्या नेतृत्वाचा आज वाढदिवस. त्यांना या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आई तुळजाभवानी, खंडेराया चरणी प्रार्थना करतो. त्यांना उदंड आयुष्य लाभो व त्यांच्या हातून अशीच तुळजापूर तालुक्यातील जनतेची सेवा घडो हीच प्रभू चरणी प्रार्थना
अजय अणदूरकर
पत्रकार, अणदूर