हजरत सफीलसाहेब यात्रा बोरगांव येथे संपन्न

- हजरत सफीलसाहेब यात्रा बोरगांव येथे संपन्न
बोरगांव /न्यूज सिक्सर
बोरगांव (तु) ता.तुळजापूर येथील ग्रामदैवत हजरत सपील साहेब यांची यात्रा प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात संपन्न झाली . गावातील सर्व धर्मीय लोकांचा सहभाग या यात्रेत मोठ्या प्रमाणात असतो त्याच बरोबर परिसरातील अन्य गावचे लोकही या यात्रेत सहभागी होतात. सालाबाद प्रमाणे दिनांक 23/03/2023 पासुन् बोरगांव चे ग्राम दैवत हजरत सफीलसाहेब यांच्या यात्रा अत्यंत आनंदी व खेळीमेळीत संपन्न झाली
दिनांक २३/०३/२0२३ संदल मिरवणुक पारंपरिक मानकरी श्री व्यंकट शंकरराव पाटील (मा. पो. पाटील) यांच्या घरातून निघुन पु्र्ण गावात वाजत गाजत दर्ग्यात पोहचली.
दिनाक् ०२४/०३/२०२३ चिराग व नैवद्य.
दिनांक २५/०३/२०२३ सकाळी जियारत. सांय. जंगी कुस्त्याचे स्पर्धा झाल्या. पंच श्री दतात्रय पाटील ,आप्पाराव मुळे , मोहन माने,लक्ष्मण पाटील, बसवंतराय मुळे, शेखर कलशेट्टी, रसूल शेख, जब्बार भाई, चाॅंदभाई, घुडलाल शेख, नजीर सैय्यद,सलीम शेख़ सुधीर गायकवाड , लक्ष्मण कांबळे,व सर्व मान्यवर ग्रामस्थांच्या सहकार्य लाभले.
शेवटची कुस्ती (रु.३१००) पै. जीवन भुजबळ व सुरज हलगुडे यांच्यात झाली. दर्जा कमीटी तर्फे मुतवल्ली श्री इस्माईल शेख यानी सर्वाचे आभार मानले. शेवटी सर्व गावक-र्याना व पहिलवानाना महाप्रसाद वाटप करण्यात आले. यात्रेमधे सहभागी होऊन यात्रा यशस्वी करून बोरगांवचे लौकिक वाढवण्यात सर्व युवक मंडळानी सुध्दा सहकार्य केले. नळदूर्ग पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांचे ही चांगले सहकार्य मिळाले आहे