बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ महविकास आघाडीच्या वतीने तोंडाला व हाताला काळी पट्टी लावून, हातात झेंडे घेऊन आंदोलन
Post- गणेश खबोले

k
लोहारा -प्रतिनिधी
उच्च न्यायालया मुंबई यांनी घालून दिलेल्या निर्बंधानुसार लोहारा शहर बंदचे आवाहन मागे घेण्यात आले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या आव्हानानुसार लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शनिवारी (दि.२४) तोंडावर काळी फीत बांधून व हातात निषेधात्मक काळा झेंडा घेऊन बदलापूर व विविध ठिकाणी देशात चिमुकल्या मुली, महिलांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ व सरकारच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त करून ठिय्या आंदोलन करण्यात आले.
महाविकास आघाडी तर्फे महाराष्ट्रामध्ये सध्या घडत असलेल्या बाल लैंगिक अत्याचार प्रकरणाबद्दल सरकारचा निषेध करण्यात आला. सामाजिक बांधिलकी या नात्याने यामध्ये आपली उपस्थिती दर्शवली, व काळी फित बांधून निषेध नोंदविला. यावेळी हे आंदोलन करण्यासाठी लोहारा तालुक्यातील अनेक नागरिक व महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. परंतु धाराशिव जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षकांनी जमावबंदी आदेश दिले आहेत असे पोलीस प्रशासनाने कळवले. त्यामुळे पोलीस प्रशासनाने केलेल्या विनंतीनुसार व घातलेल्या निर्बंधानुसार जमावबंदीचा आदेश पाळत शिवसेना (उबाठा) लोहारा तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शहरप्रमुख सलीम शेख, महेबुब गवंडी, विलास भंडारे यांच्यासह आदींनी तोंडाला व हाताला काळ्या फिती लावून व हातात झेंडे घेऊन महिला व मुलींवर होत असलेल्या अत्याचाराचा जाहीर निषेध करीत दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करीत भविष्यात अश्याया घटना घडू नयेत यासाठी सरकारने योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली.