शंकरराव जावळे पाटील महाविद्यालय, लोहारा येथे 66 वा विद्यापीठ वर्धापन दिन साजरा
Post-गणेश खबोले

लोहारा-प्रतिनिधी
शंकरराव जावळे पाटील महाविद्यालय, लोहारा येथे आज डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छ्त्रपती संभाजीनगर, 66 वा विद्यापीठ वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व स्वर्गीय शंकरराव जावळे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ.शेषेराव जावळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर त्यांच्या शुभहस्ते हस्ते विद्यापीठ ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी विद्यापीठ गीताने ध्वजाला मानवंदना देण्यात आली. तयावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषेराव जावळे पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा स्थापने पासूनचा इतिहास तसेच विद्यापीठाच्या विविध उपक्रम व शैक्षणिक बाबी याविषयी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील डॉ. विनायक पाटील, श्री. मनोज पाटील, डॉ.रामहरी सूर्यवंशी, डॉ शिवाजी कदम, डॉ.मनोज सोमवंशी, डॉ.बालाजी राजोळे डॉ.भैरवनाथ मोटे ,डॉ.प्रभाकर गायकवाड, डॉ.सुदर्शन सोनवणे, डॉ.छाया कडेकर, डॉ.पार्वती माने, डॉ . विनोद आचार्य ,डॉ.रामेश्वर धप्पाधुळे, डॉ.सुर्यकांत बिराजदार, प्रा.दत्ता कोटरंगे, श्री.बालाजी सगर डॉ.शिरीष देशमुख, श्री नंदकुमार माने, श्री.प्रविण पाटील, प्रकाश राठोड, परमेश्वर कदम, संजय फुगटे तसेच विद्यार्थी उपस्थित होते.