लोहारा येथील शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रशांत काळे,उपाध्यक्षपदी अमीन सुंबेकर
गणेश खबोले

लोहारा / प्रतिनिधी
लोहारा शहरातील मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रशांत काळे यांची तर उपाध्यक्षपदी अमीन सुंबेकर, सचिवपदी भरत पाटील, खजिनदार पदी प्रवीण कदम व मंगेश गोरे यांची सर्वोनुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
शहरातील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सव कमिटी निवडीसाठी लोहारा सुरेश वाघ यांच्या कन्या प्राथमिक शाळेत अभिमान खराडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रशांत काळे यांची तर उपाध्यक्षपदी अमीन सुंबेकर, सचिवपदी भरत पाटील, खजिनदार पदी प्रवीण कदम व मंगेश गोरे यांची सर्वोनुमते बिनविरोध निवड करण्यात आली. तर उर्वरित कार्यकारणीमध्ये मिरवणूक प्रमुखपदी शामसुंदर नारायणकर, बाळू कोरे, नामदेव लोभे, हणमंत गरड, नाना पाटील, विनोद मोरे, कुलदीप गोरे, श्रीकांत भरारे, ओमकार पाटील, नितीन गोरे, दादासाहेब रवळे, बाळासाहेब पाटील, बळीराम धारुळे, प्रेम लांडगे, शिवाजी मुळे, युवराज साळुंके, पदमाकर चव्हाण, सचिन जाधव, यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी बालाजी यादव, सहदेव गोरे, ऋषिकेश मुळे, अविनाश गोरे, आकाश यरनोळे, आकाश जावळे, संभाजी जाधव, कुंडलिक सुर्यवंशी, दिनेश गरड, गणेश मत्ते, राजू रवळे, रोहन खराडे, नितीन वाघ, यांच्यासह आदी शिवप्रेमी उपस्थित होते.