न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

Post-गणेश खबोले

 

लातुर

अतनुर ता जळकोट येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाची सांगतामहाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. म्हणून या भूमीला खर्‍या अर्थाने संत परंपरेच अनुष्ठान लाभलं आहे. संत परंपरेमुळे महाराष्ट्राला मोठा वारसा लाभला आहे. याच माध्यमातून हा वारकरी संप्रदाय खर्‍या अर्थाने संपूर्ण जगभरात पोहोचायला मदत झाली. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत तुकाराम, संत नामदेव, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत सावता माळी, संत सोपानदेव यांच्यासोबतच अनेक संतांनी आपल्या अभंगातून, निरुपणातून समाजाला एक सकारात्मक दिशा देण्याच काम केलं.
वारकरी संप्रदायामध्ये अखंड हरिनाम सप्‍ताहाला मोठे महत्त्व आहे. यामध्ये सात दिवस विविध प्रकारचे संत वाङमयाचा अभ्यास करणाऱ्या हरिभक्त परायण महाराजांकडून संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकाराम पर्यंत विविध संतांच्या रचना असलेल्या अभंगावर तत्वचिंतन मांडण्यात येते. ज्याद्वारे मनुष्य जन्मात ईश्वर नामाचे विशद केले जाते.

जळकोट तालुक्यातील अतनुर येथे अखंड हरिनाम सप्ताहाची
सांगता बुधवारी हजारो जनसागराच्या साक्षीने भक्तिमय वातावरणात झाली. अतनुर येथे अखंड हरिनाम सप्ताह भक्तिमय वातावरणात गेली सात दिवस सुरू होता. या सात दिवसांमध्ये दररोज भजन व पहाटे पाच वाजता काकड आरती होत होती. या सप्ताहाची बुधवारी ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीची गावात पायी दिंडी व शोभायात्रा काढण्यात आली. पायी दिंडी व शोभायात्रा मुख्य बाजार रस्त्यावरुन अंबाबाई मंदीर मार्गे बस स्टॅड मार्गे पाटलाच्या ईनामातुन कुंभार गल्ली,शाळेच्या मैदान अशी परिक्रमा करून भजनी मंडळीच्या हरिनामाच्या गजरात ढोल ताशाच्या निनादात व फटाक्याच्या आतिषबाजीत संपूर्ण गावात

फिरून पायी दिंडी व शोभायात्रा परत शेवटी श्री काशी विश्र्वनाथ महाराज व संजीवन समाधी श्री घाळेप्पा स्वामी महाराज यांच्या पवित्र देवस्थान असणाऱ्या मंदिरात आली. पायी दिंडी व शोभायात्रा निघाली असता यात बालगोपालांसह टाळकरी महिला पुरुषांनी टाळमृदुंगाच्या आवाजावर फुगडीचा ठेका धरला. ज्ञानदेव तुकाराम च्या गजरात संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला होता. सात दिवस चाललेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची ह.भ.प. श्री पांडुरंग महाराज शिंपले यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. व नंतर लगेच अन्नदाते सुर्यकांत पांचाळ यांच्या कडुन ठेवणण्यात आलेल्या महाप्रसादाला सुरुवात झाली. या महाप्रसादाचा लाभ अतनुर परिसरातील हजारो भाविकहाा भक्तांनी घेतला. अशाप्रकारे गेल्या सात दिवसापासून सुरू असलेल्या सप्ताहाच्या सांगतेने शहर हरिनामाच्या गजरात, ढोलताशांच्या व फटाक्यांच्या अतिषबाजीने अक्षरक्षः दुमदुमले होते.

या सप्ताह यशस्वितेसाठी कमिटी अध्यक्ष विकास सोमुसे,ऊपाध्यक्ष गोविंद पाटील येवरे,हभप दयानंद स्वामी,प्रकाश पोलीस पाटील,चंद्रकांत जोशी गुरुजी,नामदेव कोकणे,माधव सोमूसे,सुर्यकांत पांचाळ,कासन मुगदळे,अशोक पाटील माजी सभापती कृषी ऊत्पन्न बाजार समिती,ऊदगीर,मारुती गुंडीले,श्रीधर पाटील गव्हाणे,श्रीमती मन्याबाई मधुकर पत्तेवार,पञकार संजय शिदे या सर्वानी सप्ताह यशस्वी पार पाडण्यासाठी गेली दोन महिने मोलाचे योगदान व सहकार्य केले तसेच अन्य काही मंडळीनी आपल्या दिलेली जबाबदारी चोख पार पाडली म्हणुन श्री काशी विश्र्वनाथ महाराज मंदिर संमिती तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे