न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

उमरगा येथे ज्ञानज्योती गुणवंत विद्यार्थी सत्कार व ज्ञानज्योती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

Post-गणेश खबोले

लोहारा(इकबाल मुल्ला)

ज्ञानज्योती सामाजिक बहुउददेशीय संस्था, उमरगा आयोजित ज्ञानज्योती पुरस्कार, व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा रविवार दि.23 रोजी उमरगा येथे संपन्न झाला. संस्थेच्या वतीने शहरातील ओम बालाजी मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे मान्यवर व उमरगा व लोहारा तालुक्यातील 100 % निकाल लागलेल्या सर्व शाळांना ज्ञानज्योती पुरस्कार, सर्व शाळा व महाविद्यालयातील इयत्ता दहावी मध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक व इयत्ता बारावी मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी डॉ.प्रा.दिलीप गरुड (शिक्षण) रा.उमरगा -, मोहीब कादरी (साहित्यीक) रा.दाबका, विक्रम गायकवाड (उद्योजक) – पुणे, अमर सूर्यवंशी (आदर्श सरपंच), जकेकुरवाडी, उमेश जाधव (प्रगतशील शेतकरी) रा.तुरोरी, किशोर औरादे (उमेद कृषी व्यवस्थापक), रा.एकुरगावाडी, श्रीराम पोतदार, (कला क्षेत्र) रा.आष्टा का. रंजिता पवार (सामाजिक कार्य) रा.कदेर तांडा, अस्मिता सुर्यवंशी (महिला उद्योजक), रा.गुंजोटी या ९ मान्यवरांना यंदाच्या ज्ञानज्योती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच 100 % निकाल लागलेल्या सुमारे 29 शाळांनाही ज्ञानज्योती पुरस्कार देण्यात आला. दहावी परीक्षेत उमरगा तालुक्यातून सर्वप्रथम आलेले आदित्य थिटे (100 %), उमादेवी बुलबुले (100 %), सानिका घोरपडे (100 %) , पल्लवी पोतदार (100 %) व लोहारा तालुक्यातून सर्वप्रथम आलेली साक्षी कलशेट्टी (99.40) या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. तर गरीब कुटुंबातील व गुणवंत, होतकरू असलेल्या कु.अलमस अफसर डांगे रा.उमरगा, चि.रोहित सुरेश शहापुरे रा.माडज, चि.यश शशिकांत आलमले रा.कलदेव निंबाला, चि. इस्माईल खाजापाशा चप्पू रा.लोहारा, कु.स्वाती महादेव पवार रा.कवठा या सर्व विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती संस्थेकडून बाळासाहेब ठाकरे शैक्षणिक अर्थसहाय्य दरमहा शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी माजी खा..प्रा.रविंद्र गायकवाड, कार्यक्रमाचे संयोजक उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, जितेंद्र शिंदे, माजी
सभापती कृ.उ.बा.स.उमरगा, कवी अनंत राऊत, युवा सेना विभागीय निरीक्षक किरण गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, सूरज (महाराज) साळुंके, लोहारा नगराध्यक्षा वैशालीताई खराडे, गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष विजय वडदरे, सचिव प्रदीप मदने, कोषाध्यक्ष अमर देशटवार यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, शिवसेना उमरगा तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, शिवसेना लोहारा तालुका प्रमुख
जगन्नाथ पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख सचिन जाधव, शरद पवार, शहरप्रमुख योगेश तपसाळे, नाना मदनसुरे, गोपाळ जाधव, आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे