अंगरक्षकाचा फायदा घेत ट्रिपल सीट, तर जिल्हा पोलीस अधीक्षक काय कारवाई करणार;नवीन कायदे लागू कोणासाठी! दुजाभाव का ? जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना आव्हान !
जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना आव्हान !

अंगरक्षकाचा फायदा घेत ट्रिपल सीट, तर जिल्हा पोलीस अधीक्षक काय कारवाई करणार;नवीन कायदे लागू कोणासाठी! दुजाभाव का ?
जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना आव्हान !
तुळजापूर : प्रतिनिधी
वाहन चालकांना कायद्याचा धाक राहिला नसल्याने, बेशिस्त वाहनचालकांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र,
आता वाहतूक पोलीस विभागाने दंडाचे नवीन कायद्याची अंमलबजावणी कधी सुरू होणार ?त्यानुसार दुचाकीवर ट्रिपलसीट दिसल्यास थेट लायसन्स निलंबित होणार का ?, सुमारे १० हजार रुपयांपर्यंतची दंडात्मक कारवाई केली जाणार आहे हे कधी होणार का कागदावरच ?
शहरात व ग्रामीण भागात वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे हे जिवंत उदाहरण आहे. पोलीस दंडात्मक कारवाई करून देखील काही बेशिस्त चालक वाहतूक नियमांना पायदळी तुडवत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. आता वाहतूक पोलिसांनी नवीन कायदे लागू केले असून, दंडाच्या रकमेतही तिपटीने वाढ केली असून, दंड न भरल्यास थेट न्यायालयीन कारवाई केली जाणार का ? कागदावरच राहणार हे पाहणे तितकेच गरजेचे आहे.
कायद्याची भीती राहिलेली नाही राजेंद्र माने व त्यांच्या अंगरक्षकाला ट्रिपल सीट गाडी चालवायची परवानगी कोणी दिली पुन्हा एकदा (अंगरक्षक )गार्डचा गैरवापर याच्यावर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी काय कारवाई करणार ? नवीन कायदे लागू कोणासाठी! दुजाभाव का ?
दिगंबर जाधव,
सामाजिक कार्यकर्ते, तुळजापूर