ब्रेकिंगमहाराष्ट्र
मुक्तांगण इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा
मुक्तांगण इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

मुक्तांगण इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा
तुळजापुर : ज्ञानेश्वर गवळी
येथील मुक्तांगण इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सोमवारी शाळेचे अध्यक्ष दिनेश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनानुसार गुरुपौर्णिमा उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. प्रारंभी तुळजाभवानी व सरस्वतीदेवी प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका विशाखा पाटील व शिक्षिका यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिका व शिक्षक यांना गुलाबाचे फुल व पेन देऊन सर्वांचा सत्कार केला. शाळेतील काही विद्यार्थ्यांनी शिक्षकाबद्दल आपले मनोगत व्यक्त करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यासाठी शाळेतील शिक्षक राहुल जेठीथोर व आदित्य खुरुद यांनी परिश्रम घेतले. या गुरुपौर्णिमा उत्सावात शाळेतील सर्व मुला मुलींनी सहभाग नोंदविला.