
लोहारा-प्रतिनिधी
शंकरराव जावळे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लोहारा येथील इंग्रजी विभागप्रमुख डॉ. मनोज सोमवंशी यांची महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करीअर कट्टा उपक्रमाअंतर्गत राज्यस्तरीय आर्थिक साक्षरता समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल करीअर कट्टा संस्थापक अध्यक्ष यशवंत शितोळे,भारतीय शिक्षण संस्था अध्यक्ष रमेश पाटील, प्राचार्य डॉ.शेषेराव जावळे पाटील,प्राचार्य प्रवर्तक धाराशिव जिल्हा डॉ.संजय अस्वले,डॉ.हरिदास फेरे,विभागीय सह समन्वयक डॉ.नितीन पडवळ,जिल्हा समन्वयक डॉ.मंगेश खराटे,डॉ.दत्तात्रय साखरे यांच्यासह महाविद्यालयातील मनोज पाटील,डॉ.विनायक पाटील,डॉ.बालाजी राजोळे,डॉ.रामहरी सूर्यवंशी,डॉ.शिवाजी कदम,प्रा. दत्ता कोटरंगे,डॉ. विनोद आचार्य,डॉ.रामेश्वर धप्पाधुळे,डॉ.प्रभाकर गायकवाड,डॉ.भैरवनाथ मोटे,डॉ.सुदर्शन सोनवणे,डॉ.छाया कडेकर,डॉ.पार्वती माने,डॉ. सूर्यकांत बिराजदार,डॉ.संदीप कोरेकर,प्रा.प्रियंका गिरी,डॉ.शिरीष देशमुख,बालाजी सगर,नंदकिशोर माने, प्रवीण पाटील,परमेश्वर कदम,प्रकाश राठोड,संजय फुगटे यांनी अभिनंदन केले आहे.