
इक्बाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन दिलीप जाधव यांची “युवासेना जिल्हाप्रमुख धाराशिव” या पदावर निवड झाल्याबद्दल लोहारा शहरात आ.ज्ञानराज चौगुले यांच्या संपर्क कार्यालयात दि.1 मार्च 2024 रोजी लोहारा तालुका शिवसेनेच्या त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष शरद पवार, शिवसेना तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, शिवसेना तालुका उपप्रमुख परमेश्वर साळुंके, प्रताप लोभे,माजी गटनेते अभिमान खराडे, युवा सेना तालुका प्रमुख दत्ता मोरे,शिवसेना लोहारा शहर प्रमुख श्रीकांत भरारे, उमरगा शिवसेना शहर प्रमुख योगेश तपासाळे,नगरसेवक अविनाश माळी,नगरसेवक गौस मोमिन, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, रोहयोचे माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख,रमेश जाधव,मनोहर कदम,संदीपान बनकर, सुरेश दंडगुले,धर्मवीर जाधव, शेखर पाटील, कुलदीप गोरे, जितु कदम,संदीपान बनकर,रोहन खराडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.