मा.बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजणेच्या माध्यमातुन निर्मळे यांच्या विवाहात ५ ग्रॅम सोन्याची अंगठी व भरपेरावा आहेर
Post - गणेश खबोले

लोहारा / प्रतिनिधी
मा. बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेविका सौ. मयुरी अमोल बिराजदार व युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार यांच्या माध्यमातुन राबवण्यात येते.प्रभाग क्रमांक 6 मधिल सामान्य कुटुंबातील मुलीच्या कन्यादानासाठी सामाजीक बांधिलकी जपत आपलाही काही हातभार रहावा या हेतुने ही योजणा सुरवात करण्यात आली आहे.या योजणेच्या माध्यमातुन श्री.सोमनाथ निर्मळे व सौ.अलका निर्मळे यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यात पाच ग्राम सोन्याची अंगठी व भरपेरावा अहेर सोमनाथ निर्मळे यांच्या मुलीच्या विवाहप्रसंगी नगरसेविका मयुरी बिराजदार यांच्या वतीने करण्यात आला.युवासेना उपजिल्हाप्रमुख बिड दिपक शिंदे,मा.सहशिक्षक दिपक पोतदार सर,मा.अक्षय भुमकर युवासेना तालुका प्रमुख अंबोजोगाई याच्या हस्ते नविन दापत्यांच्या हातात अंगठी घालण्यात आली.
या योजणेचा लाभ प्रभाग क्र ६ मधिल काही कुटूंबांना होत आहे. यासह सामाजीक बांधिलकी जपत वेगवेगळ्या योजणांच्या माध्यमातुन सतत जनसेवेत असतात.
या पुर्वि प्रभाग ६ मधिल रघुविर घोडकेच्या मुलीच्या लग्न समारांभात मा.खा.ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते या बाळासाहेब ठाकरे कन्या सन्माण योजणेचा प्रारंभ करण्यात आला होता.
यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख बिड दिपक शिंदे,मा.सहशिक्षक दिपक पोतदार सर,माणिक चिकटे,युवासेना तालुकाप्रमुख अंबोजोगाई मा.अक्षय भुमकर,युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार,युवासेना शहर समन्वयक परळी सुदर्शन यादव,रतन पोतदार,शितल खुणे,सुनिल ठेले,महेश खबोले,आकाश निर्मळे,अनिल डोंगरे,प्रशांत निर्मळे,बसु जवादे,सोमनाथ निर्मळे,सिद्धु निर्मळे यासह अनेक निर्मळे व देशमाने परिवाराचे सदस्य उपस्थित होते.