ब्रेकिंग
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पक्षात बहुजन आघाडी तालुका उपाध्यक्ष सह कार्यकर्त्यांचा प्रवेश
Post - गणेश खबोले

लोहारा / प्रतिनिधी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) महाराष्ट्र प्रदेश जॉइंट सेक्रेटरी तथा उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय शितोळे यांच्या उपस्थितीत रोजगार आघाडीचे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष उत्तम भालेराव, रोजगार आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा (सरपंच)तोरंबा शरद मस्के यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी लोहारा तालुका उपाध्यक्ष सर्जेराव बनसोडे,महादेव वाघमारे,बालाजी चव्हाण,लक्ष्मण साळुंखे सह शेकडो कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(अ) गटात जाहीर प्रवेश केला.
लोहारा येथील रोजगार आघाडीचे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष उत्तम भालेराव यांच्या कार्यलायात प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी लोहारा तालुका सरचिटणीस बालाजी माटे,शहाजीराजे कदम आदी उपस्थित होते.