अणदूर येथे आज स्व.भगवान (भाऊ) शिंदे यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन

अणदूर येथे आज स्व.भगवान (भाऊ) शिंदे यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन
अणदूर/प्रतिनिधी
गुरुवार दि.9 फेब्रुवारी, रोजी सायंकाळी 4 वाजता येथील हुतात्मा सभागृहात भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून,यामध्ये कृषिभूषण पुरस्कार प्राप्त पांडुरंग आव्हाड यांचे उस उत्पादक शेतकऱ्यांना अनमोल मार्गदर्शन लाभणार आहे, तरी या मेळाव्यास अणदूर व परिसरातील शेतकरी बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समस्त शेतकरी बांधव अणदूर यांनी केले आहे.
स्व.भगवान भाऊ शिंदे यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्य हा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला असून यामध्ये विक्रमी ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे,मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी प्रगतशील शेतकरी शिवप्पा शेटे हे राहणार आहेत तर प्रमुख मार्गदर्शक माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, प्रमुख अतिथी म्हणून अणदूर चे सरपंच रामचंद्र आलूरे, तुळजाभवानी साखर कारखान्याचे चेअरमन सुनील चव्हाण,गोकुळ कारखान्याचे चेअरमन दत्ता भाऊ शिंदे,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, सदरील मेळाव्यात कृषिभूषण, कृषिरत्न पांडुरंग आव्हाड यांचे एकरी 120 टन ऊस उत्पादन कसे घ्यावे या विषयी मार्गदर्शन लाभणार आहे तरी या मेळाव्यास अणदूर व परिसरातील शेतकरी बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे