न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

ग्रामीण भागाचा विकास हेच माझे ध्येय-ॲड.सोमेश वैद्य आदर्श सरपंच पेरे पाटील यांच्या हस्ते नूतन सरपंच सत्कार

ग्रामीण भागाचा विकास हेच माझे ध्येय-ॲड.सोमेश वैद्य
आदर्श सरपंच पेरे पाटील यांच्या हस्ते नूतन सरपंच सत्कार
मंगरूळ /चांदसाहेब शेख

तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागाचा विकास हेच माझे ध्येय असून आमदार राणा जगजीतसिंह दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाच्या बाबतीत सतत प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन तुळजापूर येथे सत्काराला उत्तर देताना सोमेश वैद्य यांनी केले
तुळजापूर येथे लोहिया मंगल कार्यालयात आयोजित नूतन सरपंच , उपसरपंच , सदस्य व युवा शेतकरी तथा मंत्रालयात स्वीय सहाय्यक असलेल्या सोमेश वैद्य यांना सकाळ ” सन्मान पुरस्कार ” मिळाल्याबद्दल मा. विशाल रोचकरी मित्र मंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला
यावेळी बोलताना ते म्हणाले की भारताची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी ग्रामविकासात भरीव कामगिरी करणे आवश्यक आहे त्यासाठी शेतकरी , शेतमजूर यांच्यासह विविध प्रकारच्या आजारांनी पीडित असणाऱ्या रुग्णांना मंत्रालयाच्या माध्यमातून आमदार राणा दादा यांच्या मार्गदर्शनाखाली सतत प्रयत्न करून मदत करण्यास कटिबद्ध असल्याचे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले
———————————————
*महाराष्ट्रातील मानाच्या सकाळ सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आल्याने आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांनीही त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी त्यांनी उपस्थित सरपंचांना संबोधित करताना म्हणाले की वृक्षारोपण , शुद्ध पाणी , स्वच्छता , शिक्षण व अबाल वृद्धांचे संगोपन या ५सूत्री कार्यक्रमाचा अवलंब करून गावाचा विकास करावा व गाव गाडा उत्तमरित्या हाताळून गावाच्या जबाबदारीतुन मुक्त व्हावे असे आव्हानही केले
यावेळी वैद्य यांच्याकडून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ लिखित ” सरपंचपद संधी व आव्हाने ” पुस्तक उपस्थित मान्यवरांना भेट देण्यात आले
—————————————
यावेळी मा. नगरसेवक विशाल रोचकरी , सज्जनराव साळुंखे , मा. उपसभापती दत्ता शिंदे , जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील , भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे , गजानन वडणे , बालाजी शिंदे यांच्यासह तालुक्यातील ७० – ८० गावातील सरपंच , उपसरपंच , सदस्य व राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे