महायुतीचे उमेदवार राणाजगजीतसिंह पाटील यांना तुळजापूर तालुक्यातुन उत्स्फूर्त प्रतिसाद – खुंडू कुंभार
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

महायुतीचे उमेदवार राणाजगजीतसिंह पाटील यांना तुळजापूर तालुक्यातुन उत्स्फूर्त प्रतिसाद – खुंडू कुंभार
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर विधानसभा २४१ निवडणुकीच्या महायुतीचे उमेदवार आमदार राणाजगजीतसिंह पाटील त्यांच्या प्रचारासाठी पक्षश्रेष्ठीचा आदेश पाळत स्वखर्चाने प्रचाराचा विडा उचलला आहे. मात्र महायुतीचे उमेदवार राणाजगजीतसिंह पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना विधानसभा प्रमुख खंडू बब्रवान कुंभार यांचा आज तीन दिवस झाले प्रचाराचा शुभारंभ करून प्रचारात आघाडी घेतली आहे.शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना विधानसभा प्रमुख खंडू बब्रवान कुंभार यांनी स्वखर्चाने रथ तयार करून झेंडे पंचे बॅनर लावून तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात जोरदार प्रचार चालू केला आहे.प्रचाराचा शुभारंभ तरुण युवकाचे प्रेरणास्थान असलेले युवा नेते मल्हार राणाजगजीतसिंह पाटील तसेच शिवसेनेचे सहसचिव अमरराजे कदम – परमेश्वर यांच्या शुभहस्ते प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला आहे .