
——————–
धाराशिव ( सतीश राठोड ) :- शासन एकीकडे मतदानाचा टक्केवारी वाढावा यासाठी प्रयत्न करीत आहेत तर दुसरीकडे मात्र उमरगा तालुक्यातील अंबर नगर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आचार्य तांडा येथील ग्रामस्थांनी राहतं घर जागा मालकी हक्क करून द्यावेत अशी मागणी जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .
निवेदनात पुढे म्हटले आहे की , आमच्या तांड्यातील जागा प्रत्येक कुटुंबीयांच्या नावे मालकी हक्क नोंद करून मिळावेत . संपूर्ण तांड्यातील कुटुंबांची घरांची जागा नोंद भोगवटा खाली नोंद आहे . येथील घराची नोंद भोगवटाखाली असल्याने त्या कुटुंबीयास घरकुल सह अन्य शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील शासन आमची दखल घेत नाही असा निवेदनाद्वारे आरोप करीत वैतागलेल्या ग्रामस्थांनी आमच्या मागण्या शासनाने मान्य न केल्यास 7 मे 2024 रोजी होणाऱ्या लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे . आचार्य तांडा येथे एकूण 120 कुटुंब वास्तव्यास असून पाचशेच्या जवळपास लोकसंख्या आहे गेल्या शंभर वर्षापासून येथे बंजारा समाज वस्ती करून वास्तव्यास राहत आहेत . लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक लागली की फक्त पुढारी आश्वासने देण्यासाठी येतात एकदा निवडणूक झाली की आमच्या मागण्याकडे कोणी लक्ष देत नाही असा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे . जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनावर गोपाळ चव्हाण , गुलाब राठोड , मोतीराम चव्हाण , संजय राठोड , सुरेश चव्हाण , तुकाराम राठोड , भीमराव चव्हाण , गोपाळ राठोड , गोविंद राठोड , गणपत चव्हाण , सईन जाधव , फुलचंद चव्हाण संतोष चव्हाण लक्ष्मण चव्हाण सह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत . शासन येथील ग्रामस्थांच्या मागणीकडे लक्ष देतील का हे आता पहावं लागणार आहे .