महायुतीच्या उमेदवार सौ.अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ पांढरी (वि), माळेगाव, मोघा (बु), (खु), येथे आ.ज्ञानराज चौगुले यांची गावभेट
पोस्ट -गणेश खबोले

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघातील शिवसेना – भारतीय जनता पार्टी – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – रिपाई – रासप महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.अर्चनाताई राणाजगजीतसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ आ.ज्ञानराज चौगुले यांनी लोहारा तालुक्यातील पांढरी (वि), माळेगाव, मोघा (बु), (खु), येथे दि.2 मे 2024 रोजी गावभेट देऊन नागरिक, महिला व युवकांशी संवाद साधला. यावेळी आ.ज्ञानराज चौगुले, राष्टवादी कॉग्रेस प्रवक्ते मंदार पाठेकर, शिवसेना शेखर पाटील महाराज, भाजपाचे नेते दिलीपसिंह गौतम, अदिंनी मार्गदर्शन करताना म्हणाले कि, केंद्रात गेल्या 10 वर्षांमध्ये मोदी सरकारने प्रचंड गतीने विकास केला आहे. देशातल्या कानाकोपऱ्यात, ग्रामीण भागांपर्यंत हा विकास पोहोचला असून आपल्या धाराशिव जिल्ह्यात देखील अनेक लाभार्थ्यांना याचा मोठा लाभ मिळाला आहे. म्हणूनच पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी सौ.अर्चना पाटील यांना प्रचंड मताधिक्याने संसदेत पाठवण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. असे सांगीतले.व तसेच लोहारा उमरगा तालुक्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांच्या कडे पाठपुरावा करुण लोहारा उमरगा तालुक्यात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुण विकास कामे मोठ्या प्रमाणात केली आहेत. तुम्ही मला तिनदा आमदार होण्याची संधी दिली म्हणुन मी मोठ्या प्रमाणात विकास करु शकलो. आ. राणाजगजितसिंह पाटील यांनीही जिल्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे
केली आहेत. व आपल्या महायुतीच्या
उमेदवार अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांनी जि.प.च्या उपाध्यक्ष असताना महिलांची मोठ्या प्रमाणात कामे करुण निधी उपलब्ध करुण विकास कामे मोठ्या प्रमाणात केली आहेत. तरी महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे रहावे, असे अवाहान यावेळी केले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन पणुरे, राष्टवादी कॉग्रेस प्रदेश कार्यकारणी सदस्य किशोर साठे, शिवसेना तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, राष्ट्रवादी कॉग्रेस तालुकाध्यक्ष सुनिल साळंके, शिवसेना नेते राजेंद्र माळी, माजी गटनेते अभिमान खराडे, कृ.उ. बाजार समिती माजी सभापती दयानंद गिरी, नगरसेवक अविनाश माळी, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, शिवसेना तालुका उप प्रमुख परमेश्वर साळुंके, सरपंच मारुती कार्ले, महादेव कार्ले, सुर्यकांत पाटील, सरपंच वैभव पवार, भाजपा तालुका सरचिटणीस दगडु तिगाडे, बालाजी बाभळे, शरण कुंभार, राम पाटील, इंद्रजित पाटील, शहाजी गर्जे, तुकाराम गर्जे, राम गर्जे, युवराज जाधव,शाहुराज सुरवसे, व्यंकट सुरवसे, रमेश सुरवसे, तुकाराम भोंडवे, श्रीकांत पाटील, कांत पाटील, विनोद मुसांडे, दिलीप पवार, ओबीसी भाजपा तालुकाध्यक्ष बालाजी सोनटक्के, बाजीराव भोंडवे, महादेव पाटील, अगंद भोंडवे, लक्ष्मण भोंडवे, विठ्ठल पाटील, अप्सर शेख, दत्ता भोंडवे, उध्व भोंडवे, राम मत्ते, भरत मत्ते, गजराबाई श्रीगिरे, कोंडाबाई गर्जे, भागाबाई मुरमे, नानंदा सुरवसे, मनिषा पवार, कल्पना गोरे, परमेश्वर गोरे, यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते