मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जनजागृती करावी — ॲड.कु. आकांक्षाताई ज्ञानराज चौगुले
Post-गणेश खबोले

इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनीधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जनजागृती करावी, पात्रतेबाबत शासनाने अनेक अटी शिथील केल्या आहेत. याबाबत सर्व सामान्य कुटुंबातील महिलांना माहिती द्यावी, जेणेकरून महिलांना कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही, त्रुटी आढळल्यास कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन फार्म भरुन महिलांना सहकार्य करावे, असे आवाहान युवासेना युवती मराठवाडा पक्ष निरीक्षक ॲड.कु.आकांक्षाताई ज्ञानराज चौगुले यानी केले. मुरूम येथे युवासेना युवती मराठवाडा पक्ष निरीक्षक ॲड.कु.आकांक्षाताई ज्ञानराज चौगुले यांनी शिवसेना संपर्क कार्यालय, मुरूम येथील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कार्यालयास दि.25 जुलै 2024 रोजी कु.आकांक्षाताई चौगुले यांनी सदिछ्या भेट दिली. यावेळी त्या बोलल होत्या. यावेळी आकांक्षाताई चौगुले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना माजी उपतालुकाप्रमुख चंद्रशेखर मुदकण्णा, अमृत वरनाळे, उप तालुकाप्रमुख राघू शिंदे, संतोष मुदकण्णा, सचिन शिंदे पाटील, प्रसाद मुदकण्णा, युवासेना शहरप्रमुख भगत माळी, नागेश मुदकण्णा, अमोल कटके, वैभव कटके, श्रावण इंगळे प्रशांत गुरव, गणेश आपटे, यांच्यासह शिवसेना, युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.