उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिवकरवाडी,लोहारा येथे शालेय साहित्य वाटप

लोहारा-प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्टवादी कॉग्रेस लोहारा तालुका यांच्यावतीने लोहारा शहरातील जि.प. के. प्राथमिक शाळेत व शिवकरवाडी येथील जि.प.प्रा.शाळेत विद्यार्थ्यांना दि.२६ जुलै रोजी शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी राष्टवादी कॉग्रेस तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, राष्टवादी कॉग्रेस पार्टी उद्योग विभागाच्या धाराशिव ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक जालिंदर भाऊ कोकणे, उपनगराध्यक्ष तथा राष्टवादी शहराध्यक्ष आयुब हबीब शेख, राष्टवादी कॉग्रेस जिल्हा उपाध्यक्ष हाजी बाबा शेख, जिल्हा सचिव हेमंत माळवदकर, प्रकाश भगत,अहेमद शेख (सलगरा दि.),सालेगाव सोसायटी चेअरमन मुरलीधर पाटील,शिवव्याख्याते गोपाळ माने,बालाजी मातोळे,बालाजी मक्तेदार,शिवकरवाडी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अपसर पठाण,उपाध्यक्ष अविनाश शिवकर,शिवकरवाडी येथील कार्यक्रमाचे आयोजक रसूल पठाण,माजी सैनिक राम लांडगे,दगडू शिवकर,विशाल लांडगे, शाळेचे शिक्षक गोविंद जाधव, शिक्षिका राठोड मॅडम, अंगणवाडी शिक्षिका कल्पना शिवकर, अशा वर्कर मंदाकिनी लांडगे, बालाजी कांबळे, विशाल लांडगे यांच्यासह राष्टवादी कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, गावातील पालक उपस्थित होते.