
तुळजापूर-प्रतिनिधी
जि. प. प्रा. बारुळ ता.तुळजापूर येथे” गुढी पाडवा- प्रवेश वाढवा” या उपक्रमाच्या निमित्ताने आज इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. सुरुवातीला गावातून प्रभात फेरी काढून जिल्हा परिषद शाळेत मुलांना दाखल करण्याचे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले. यावेळी एकूण वीस विद्यार्थ्यांचे प्रवेश करण्यात आले. त्यानंतर नवागत विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षकाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सौदागर शेख यांनी जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली नवीन वर्षासाठी सीबीएससी हा पॅटर्न राबविण्यात येणार आहे असे सांगितले. व शाळेत तर्फे दिल्या जाणाऱ्या मोफत शैक्षणिक सुविधा, योजना, शाळेच्या गुणवत्तेची माहिती पालकांना दिली. सध्या निपुण महाराष्ट्र अभियान २०२५ या अभियानाच्या निमित्ताने इयत्ता तिसरीच्या वर्गाचे चावडी वाचन ही घेण्यात आले .शिक्षक बालाजी पवार, अमिन मुलाणी,शिक्षिका जाधव सरोजनी ,गडेकर रूपाली , शितल वाघमारे , कल्पना चव्हाण, मनीषा राजगुरू शा.व्य.समितीचे अध्यक्ष मन्मथ ठोंबरे, पोलीस पाटील शिवाजी सगर, चंद्रकांत वट्टे, शहनाज पठाण , तुषार मंडळकर उपस्थित होते.