
धाराशिव ( सतीश राठोड ) :- लोकसभा महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचाराकरिता तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील वसंत नगर येथे दि 3 मे रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांचे नातू आमदार इंद्रनील नाईक , भाजपाचे प्रदेश सचिव देविदास राठोड व भाजपाचे प्रदेश कार्यकारणी विशेष निमंत्रित सदस्य विद्यानंद राठोड यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत येणाऱ्या सात तारखेला घड्याळ या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले आहे .आमदार इंद्रनील नाईक व भाजपाचे देविदास राठोड हे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आले असता ते नळदुर्ग येथील वसंत नगर येथे सदिच्छा भेट दिली असता ग्रामस्थांनी त्यांच्या येथोचित सन्मान केला .यावेळी उपस्थित मान्यवरांनी येथील संत सेवालाल महाराज व आई जगदंबे मंदिरास भेट देऊन दर्शन घेत धाराशिव लोकसभा महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील ह्या विजयी व्हाव्यात यासाठी संत सेवालाल महाराज व आई जगदंबे देविस साकडं घातलय .
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांचे नातू आमदार इंद्रनील नाईक हे वसंत नगर येथे पहिल्यांदाच वसंतनगर येथे आल्याने ग्रामस्थांनी त्यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती. यासह उमरगा तालुक्यातील आनेक तांडा वाड्या वस्तीवर जावून त्यांनी नागरिकांशी संवाद साधला .
याप्रसंगी घड्याळाला मत म्हणजे मोदीला मत असा संदेश ही दिला . याप्रसंगी बंजारा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष निरंजन राठोड , तांडा वस्ती अभियानाचे छिमाबाई राठोड , बंजारा क्रांती दल युवा आघाडीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष महेश चव्हाण , आकाश आडे , राहुल पवार , विकास राठोड , मिथुन पवार , आकाश राठोड , वासुदेव राठोड , रोहित राठोड , अक्षय सुरवसे , राहुल पाटील सह कार्यकर्ते उपस्थित होते .