ब्रेकिंगमहाराष्ट्र
मराठा आरक्षण आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

मराठा आरक्षण आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा व सिंदफळ मराठा आरक्षण आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. अनेक तालुक्यातील गावांमध्ये प्रवेशबंदीचे ठराव घेण्यात आले आहेत.
राजकीय कार्यक्रमांची संख्या कमी झाली आहे. मनोज जरांगे यांनी नेत्यांना गावबंदी करण्याचा मुद्दा मांडताच अनेक गावांनी वेशीत प्रवेशबंदीचे फलक झळकावले आहेत.
आरक्षणाच्या निर्णयासाठी राज्य सरकारने शिंदे समिती नेमली आहे. ही समिती सरकारला अहवाल सादर करणार आहे. मराठा आरक्षण न मिळाल्यास २५ ऑक्टोबरपासून व्यापक आंदोलन होणार असल्याचे जरांगे यांनी जाहीर केले आहे.