उस्मानाबाद तालुक्यातील बावी (का ) येथे लोकप्रतिनिधिंना गावबंदी बावीरांनी घेतला ठराव
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

उस्मानाबाद तालुक्यातील बावी (का ) येथे लोकप्रतिनिधिंना गावबंदी बावीरांनी घेतला ठराव
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
उस्मानाबाद तालुक्यातील बावी (का ) ग्रामपंचायतीच्या वतीने मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण जाहीर होत नाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी असा ठराव घेण्यात आला आहे. बावी (का ) गावाचे सरपंच हे निवेदन तहसीलदार यांना देणार आहेत. या ठरावात राजकीय नेत्यांना गावामध्ये प्रवेशबंदी,राजकीय कार्यक्रमावर बहिष्कार आणि मतदानावर बहिष्कार टाकण्यात निर्णय घेण्यात आला आहे.
बावी (का ) ग्रामपंचायत सदस्य, राहुल साळुंके, धिरज पाटील, राहीत पवार, विठठल मुळे यांच्यासह गावातील ग्रामस्थ हर्षद, तांबे, प्रविण तांबे, सुधाकर तांबे, शरद जाधव, रामेश्वर कपाळे, आणासाहेब पवार, महेश पाटील, पत्रकार बालाजी साळुंके, संतोष उंडे, माजी सरपंच सुहास उंडे, महेश जाधव, श्रीनिवास तांबे, डॉ प्रविण मुळे, निवृत्ती मुळे, ज्ञानेश्वर उंडे, सुरेश पाटील, सुरज उंडे,राणाप्रताप पाटील, सचिन पाटील,संदिपान जाधव,योगेश महाडीक यांच्या स्वाक्षरी आहेत.