न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

आयोध्येतील प्रभू श्री राम लल्लाचे दर्शन घेण्यासाठी लोहारा तालुक्यातील 138 रामभक्त रवाना,

Post - गणेश खबोले

लोहारा/प्रतिनिधी

आयोध्येतील प्रभू श्री राम लल्लाचे दर्शन घेण्यासाठी लोहारा तालुक्यातील 138
रामभक्त दि.05 मार्च 2024 रोजी सायंकाळी धाराशिव येथून आस्था रेल्वेच्या माध्यमातून विशेष रेल्वेने अयोध्येला गेले आहेत. सुमारे पाचशे साठ वर्षाच्या लढ्यानंतर प्रभू रामचंद्राचं मंदिर सर्वसामान्य नागरिकांसाठी आता दर्शनासाठी खुले झाले आहे प्रभू रामचंद्र हे सर्वसामान्यच्या अस्तित्वाच आणि त्याच सोबत अस्मितेच प्रतीक असलेलं स्थळ म्हणजे आयोध्या आणि या आयोध्यामध्ये भव्य दिव्य राम मंदिर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते उपस्थितीत ज्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम झाला होता. त्या राम लल्लांचे दर्शन घेण्याचा योग लोहारा तालुक्यातील 138 राम भक्तांना आला आहे. हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. हे सर्व राम भक्त विशेष रेल्वेने अतिशय भक्तिमय वातावरणात सुमधुर श्रीराम नामाचा जप करत आयोध्येकडे प्रयाण केले आहेत. या सर्व रामभक्तांचे लोहारा तालुका भाजपाच्या वतीने शहरातील भारतमाता मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत जय श्रीराम जयघोषात भव्य अशी रॅली काढण्यात आली. यावेळी सर्वप्रथम भारतमातेचे पुजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा उमरगा लोहारा विधानसभा निवडणूक प्रमुख राहुल दादा पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, विक्रांत संगशेटी, प्राचार्य शहाजी जाधव यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी सर्व रामभक्तांना शुभेच्छा देऊन त्यांचे स्वागत करुन शहरातुन गाडीची व्यवस्था करुन धाराशिव रेल्वे स्टेशन पर्यंत पाठविण्यात आले.
यावेळी उमरगा, लोहारा विधानसभा निवडणूक प्रमुख राहुल दादा पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, माजी जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेटी, बबनगिरी महाराज, भारतमाता मंदिर चे पुर्णवेळ कार्यकर्ते शंकर जाधव, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, तालुका सरचिटणीस दगडु तिगाडे, तालुका सरचिटणीस विष्णु लोहार, तालुका उपाध्यक्ष संपत देवकर, तालुका उपाध्यक्ष दिलीप पवार, तालुका चिटणीस युवराज जाधव, युवा मोर्चा शहराध्यक्ष बाबा सुंबेकर, नगरसेवक दिपक मुळे, नगरसेवक प्रशांत काळे, प्रसिध्दी प्रमुख निकेश बचाटे, शिवाजी पवार, उद्य कुलकर्णी, मदन कुलकर्णी, मंजुषा कुलकर्णी, रवि कुलकर्णी, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, योगेश देवकर, दत्ता कडबाणे, व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष मल्लीनाथ फावडे, पं.स.माजी सदस्य ज्ञानेश्वर परसे, प्रा.यशवंत चंदणशिवे, दत्ता दंडगुले, गोवर्धन मुसांडे, प्रभुलिंग बसटे, गोविंद यादव, दत्ता कडबाणे, बालाजी चव्हाण, विकी राजपुत, सिध्दु गोफणे, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे