अक्षय भालेराव या बौद्ध तरुणाची हत्या करणाऱ्या जातीवादी गाव गुंडांना फाशीची शिक्षा करा

अक्षय भालेराव या बौद्ध तरुणाची हत्या करणाऱ्या जातीवादी गाव गुंडांना फाशीची शिक्षा करा
उस्मानाबाद/न्यूज सिक्सर
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी का केली म्हणून याचा राग मनात ठेवून नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गावांमध्ये अक्षय भालेराव या बौद्ध तरुणांची जातीयवादी गावगुंडांनी निर्दयीपणे हत्या केली. हत्या करणाऱ्या आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात)पक्ष धाराशिव जिल्ह्य शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्या मार्फत मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना देण्यात आलेआहे
यावेळी निवेदनामध्ये म्हटले आहे की जातीयवादी गावगुंडांनी केलेल्या मारहाणी मध्ये अक्षय भालेराव यांना गंभीर जखमी करून क्रूर पणे हत्या केली. तसेच अक्षय भालेराव च्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरीत सामावून घावे व त्यांच्या कुटुंबाला तात्काळ 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी तसेच सर्व आरोपींना अटक करून हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा मयत अक्षय भालेराव याने स्वतःफिर्यादीमध्ये नमूद केलेल्या सर्व आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी या प्रकरणी योग्य ती कारवाई न झाल्यास पक्षाच्या वतीने धाराशिव जिल्ह्यामध्ये मध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी निवेदनावर पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत सामाजिक कार्यकर्ते भाई फुलचंद गायकवाड अशोकभाऊ बनसोडे पोपट लांडगे पत्रकार शितल शिंदे नवनाथ जोगदंड लहू खंडागळे गौतम धावारे बालाजी माने आकाश खंडागळे युवराज बनसोडे सुरज खंडागळे तालुकाध्यक्ष संपत सरवदे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष रणजीत मस्के यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.