स्वराज्य संघटनेच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी महेश गवळी यांची नियुक्ती

स्वराज्य संघटनेच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी महेश गवळी यांची नियुक्ती
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तालुक्यातील आरळी बु येथील महेश मसाजी गवळी यांची संभाजीराजे छत्रपती यांच्या आदेशानुसार स्वराज्य संघटना धाराशिव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्र प्रदेश संपर्क प्रमुख तथा प्रवक्ते करण गायकर यांनी दिले आहे.महेश गवळी यांनी यापूर्वी ही सामाजिक संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलन असो किंवा ग्रामीण मूलभूत समस्या बाबत वेळोवेळी भूमिका घेत न्याय मिळवून देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे, त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्यात सर्व राजकीय पक्षांना पर्याय म्हणून निर्माण केलेल्या स्वराज्य संघटनेत स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्या आदेशावरुन धाराशिव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे. तरी आपण या पदाचा स्वीकार करुन समाज उपयोगी व सर्वांना प्रेरक असे कार्य करावे. नियुक्ती पत्राद्वारे करण गायकर यांनी ही शुभेच्छा दिल्या आहेत.गवळी यांच्या निवडीनंतर,जिवनराजे इंगळे,औदुंबर जमदाडे, सत्यजित साठे, रोहन देशमुख, कुमार टोले, अण्णासाहेब क्षिरसागर,प्रशांत अपराध, प्रशांत इंगळे आदींसह मित्र परिवार व गांवकरी बांधवांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.