
तुळजापूर (प्रतिनिधी)
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री तथा विधान परिषद सदस्य आमदार विक्रांत जी पाटील यांनी पक्षाच्या संघटनात्मक बैठकी साठी आले असता त्यांनी आई तुळजा भवानी चे महापूजा करून दर्शन घेतले आणि दिल्ली येथे भारतीय जनता पार्टीची बहुमताने सत्ता आली त्यामुळे त्यांनी भाविक भक्तगण याना पेढे वाटले आणि जल्लोष केला.
याप्रसंगी उपस्थित जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे नगराध्यक्ष सचिन भय्या रोचकरी प्रदेश कार्यकारणी सदस्य अनिल काळे गुलचंद (भाऊ )व्यवहारे माजी नगरसेवक अविनाश गंगणे तालुका सरचिटणीस शिवाजी बोधले माजी नगराध्यक्ष सुहास साळुंके उद्योग आघाडीचे जिल्हा संयोजक राजाभाऊ मलबा जिल्हा कोषाध्यक्ष नेताजी शिंदे सचिन रसाळ सतीश सरवदे उमेश गवते शेखर छत्रे युवा मोर्चा तालुका सरचिटणीस सागर पारडे बाळासाहेब भोसले ऋषिकेश साळुंके समर्थ पैलवान उमेश शेंडगे अभिषेक पवार विलास पारडे उपस्थित होते