न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

घरफोडी करणार आरोपी गजाआड धाराशिव शहर पोलीसांची कामगिरी

Post-गणेश खबोले

 

धारशिव-प्रतिनिधी

 

राहुल राजाभाउ यादव, वय 37 वर्षे, रा. विठ्ठल रुक्मिणी मंदीराजवळ ओमन ता.जि. धाराशिव हे घरास कुलूप लावून दि.25 /10/24 रोजी कामाला गेले असता सकाळी 9.00 ते 11.00 वा. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घराचे कडीकोंडा तोडून घरातीन कपाटात ठेवलेले सोन्याचे कानातील फुले जुने वापरते किंमत अंदाजे 12,000 रुपये तसेच रोख रक्कम 4,000 रुपये असे एकूण 16,000 रुपये ची चोरी झाल्याची तक्रार पोलीस ठाणे धाराशिव शहर येथे दि. 25/10/2024 रोजी अज्ञात चोरट्या विरुध्द पोस्टे धाराशिव येथे गुरनं 451/2024 कलम 331 (3), 305 (अ) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचे तपासात पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन,उपविभागीय पोलीस अधिकारी, धाराशिव विभाग स्वप्रिल राठोड, यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक शकील शेख, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप ओहोळ,ग्रेड पोलिस निरीक्षक देविदास हावळे, पोहेकॉ पठाण, पोअं-जमादार, मपोअं-देशमुख यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरुन तसेच तांत्रिक विश्लेषणाद्वारे सदरचा गुन्हा हा आरोपी नामे सौरभ हरीदास काळे रा.वाकी ता.आष्टी जि.बीड यांने केल्याचे निष्पण करुन त्यास वाकी ता.आष्टी जि.बीड येथून ताब्यात घेवून त्याचेकडे विचारपुस केला असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. असुन त्याचेकडून गुन्ह्यातील गेला माल सोन्याचे कर्ण फुले 7,000 रुपये किमतीचे, 4,000 रुपये रोख रक्कम तसेच गुन्हा करताना वापरलेली मोटार सायकल जिचा पासिंग नं एमएच 23 बिजे 8112 अंदाजे 1,00,000 रुपये असा एकूण 1,11,000 रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला असुन आरोपीकडे अधिक तपास सुरु असुन आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन उपविभागीय पोलीस अधिकारी, धाराशिव विभाग स्वप्रिल राठोड, यांचे मार्गदर्शनाखाली धाराशिव पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक शकील शेख, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप ओहोळ, ग्रेड पोलिस निरीक्षक देविदास हावळे, पोहेकों-पठाण, पोअं-जमादार, मपोअं-देशमुख यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे