दिव्यांग संघटना समन्वय समिती स्थापन – अध्यक्ष मयुर काकडे
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

दिव्यांग संघटना समन्वय समिती स्थापन – अध्यक्ष मयुर काकडे
तुळजापूर : प्रतिनिधी
सर्व दिव्यांग संघटनेच्या वतीने दिव्यांग संघटना समन्वय समिती उस्मानाबाद स्थापन करण्यात आली. सुरुवातीला महादेव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संघटनांच्या पदाधिकाय्रांची बैठक घेण्यात आली. बैठकीत सर्व दिव्यांग संघटनांची समन्वय समिती स्थापन करण्याचे सर्वानुमते ठरले. या समन्वय समितीच्या अध्यक्षपदी मयुर काकडे, सचिवपदी महादेव ह शिंदेपाटील व उपाध्यक्षपदी प्रदिप डोके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उर्वरीत कार्यकारिणी पुढील बैठकीत निवडण्यात येणार आहे. या समन्वय समितीमध्ये दिव्यांगाशी संबंधीत शासकीय कार्यालयातील अधिकारी हे सल्लागार व मार्गदर्शक म्हणून नियुक्त येतील. या दिव्यांग संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील दिव्यांगाची एकजूट करणे, त्यांना हक्काचे व्यासपिठ मिळवून देणे, विविध शासकीय योजना व सवलतीचा लाभ दिव्यांग व्यक्तींना मिळवून देणे, बेरोजगार दिव्यांग व्यक्तिसाठी रोजगार मेळावा आयोजित करणे,दिव्यांगाचे मेळावे आयोजित करणे, दिव्यांग कायद्याच्या प्रचार व प्रसारासाठी कार्यशाळा आयोजित करणे, दिव्यांग वधूवर मेळावे आयोजित करणे, दिव्यांग बचत गट स्थापन करणे, दिव्यांग व्यक्तिला कायद्याचे संरक्षण देणे, त्यांच्यावरील अन्याय दूर करुन न्याय मिळवून देणे या उद्देशासह ही समन्वय समिती कार्य करेल. दिव्यांग संघटना समन्वय समितीच्या स्थापनेचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.