शहरातील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी शक्ती मुक्त वर्गणी हि संकल्पना राबवावी – पोलिस निरीक्षक गजानन घाडगे
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी, तुळजापूर

शहरातील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी शक्ती मुक्त वर्गणी हि संकल्पना राबवावी – पोलिस निरीक्षक गजानन घाडगे
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
शहरातील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी शक्ती मुक्त वर्गणी हि संकल्पना पुढाकार घेऊन गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडावा असे आवाहन पोलिस निरिक्षक गजानन घाडगे यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या आयोजित बैठकीत सोमवारी दि ११ रोजी .तुळजापूर पोलिस ठाण्यात आयोजित केलेला बैठकीत बोलत होते
आगामी गणेश उत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाणे तुळजापूर येथे 1200 सुमारास गणेश मंडळ पदाधिकारी तसेच शांतता समितीचे सदस्य मोहल्ला समितीचे सदस्य इत्यादींची बैठक घेण्यात आली.
आगामी गणेशोत्सवा वर्गणी मुक्त तसेच डीजे डॉल्बी न लावता साजरा करावा, वृक्षारोपण, रक्तदान,समाज जागृती कार्यक्रम इत्यादींचे आयोजन करावे, तसेच गणेश मंडळ स्थापन करण्या अगोदर, ऑनलाइन फॉर्म भरून गणेश मंडळाची नोंदणी करावी, गणेश मंडळासाठी अधिकृत वीज कनेक्शन घ्यावे, गणेश मंडळाकरिता लावण्यात येणारे स्टेज हे रस्त्याच्या बाजूला वाहनानां अडथळा होणार नाही अशा ठिकाणी लावण्यात यावे, गणेश मंडळाजवळ रात्रपाळी व दिवस पाळी करिता दोन स्वयंसेवक नेमण्यात यावे तसेच नेमण्यात आलेल्या स्वयंसेवकांची माहिती मोबाईल नंबर बोर्ड लावून मंडळाजवळ ठेवावी, विसर्जन मिरवणुकी वेळी स्वयंसेवक नेमण्यात यावे तसेच कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत यावेळी बैठकीत औदुंबर कदम शांतता समिती सदस्य, पंकज शहाणे लोकसेवा फाउंडेशन अध्यक्ष, धैर्यशील कापसे भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्य तसेच महेश गवळी मराठा क्रांती ठोक मोर्चा सदस्य, अजय साळुंखे जनहित संघटना, राजेश्वर कदम, आकाश शिंदे, तानाजी कदम आरपीआय, आनंद पांडागळे, ॲडव्होकेट गिरीश लोहारेकर,हेमंत कांबळे याबरोबरच तुळजापूर शहरातील सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी हजर होते, बैठकीमध्ये पंकज शहाणे यांनी तुळजापूर शहरात ग्राम सुरक्षा दल चालू करण्यात यावे याबाबत युवकांना आवाहन केले. बैठकीकरिता पोलीस ठाणे तुळजापूर येथील ज्ञानेश्वर कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक बसवेश्वर चेनशेट्टी, पोलीस उपनिरीक्षक, रवी भागवत पोलीस हेड कॉन्स्टेबल, पोपट क्षीरसागर पोलीस हेड कॉन्स्टेबल इत्यादी हजर होते.
मिरवणूकीत डिजेला परवानगी नाही पारंपारिक वाद्य वापर करा यावेळी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना पोलिस निरीक्षक घाडगे यांनी बोलाताना सांगितले कि गणपती विसर्जन मिरवणुकीत यंदा डिजेला परवानगी दिली जाणार नाही त्यामुळे गणेश मंडळांनी आवाजाची मर्यादा राखून पारंपारिक वादयाचा वापर करून मिरवणुकाकीला कसले ही गालबोट लागणार नाही याची काळजी घेऊन शांततेत पार पाडावे शहरातील गणेश मंडळांनी वर्गणी सक्तीने वसूल करू नये अन्यथा गय केली जाणार नाही.