महसूल व कृषी अधिकारी यांच्या हलगर्जीपणा मुळे शेतकरी अनुदानापासून वंचित
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी तुळजापूर

महसूल व कृषी अधिकारी यांच्या हलगर्जीपणा मुळे शेतकरी अनुदानापासून वंचित
प्रशासनाने बळीराजावर दुजाभाव केला आहे.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
अतिवृष्टी मध्ये नुकसान व बाधित झालेल्या पिकांचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या यादीतून तुळजापूर तालुका वगळल्या बाबत महाविकास आघाडी तुळजापूरच्या वतीने सोमवार दि. 7 ऑक्टोंबर रोजी तहसीलदार तसेच तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात असे नमूद केले आहे की,
अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना सुद्धा पिकांचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या यादी मधून तुळजापूर तालुका वगळल्याने शेतकऱ्यात संताप व्यक्त केला जात असून महसूल अधिकारी व कृषी अधिकारी यांच्या हलगर्जी व निष्काळजीपणामुळे तालुक्यातील नुकसानीची माहिती शासन ला वेळेवर देऊ शकले नसल्याने संपूर्ण तालुका वगळला गेला त्यामुळे शेतकरी बळीराजा वंचित राहीला आहे शेतकऱ्यावर एक प्रकारे महसूल प्रशासनाने अन्याय केला आहे. नुकसान पिकांचे नुकसानीची माहिती तात्काळ शासनाला देऊन नुकसान भरपाई लवकरात देण्यात यावी अन्यथा महाविकास आघाडी तुळजापूर मार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, जनसेवक अमोल कुतवळ, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, शिवसेना नेते शाम पवार, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तोफिक शेख, संजय देशमुख, निहाल पठाण, सुनील चंद्रहार जाधव, शरद जगदाळे, सह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.