
लोहारा-प्रतिनिधी
वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाष चंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय लोहारा येथे श्री सुभाष चव्हाण साहेब गटशिक्षणाधिकारी लोहारा यांच्या सेवापुर्ती निमित्त सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीमती उर्मिला पाटील या होत्या तर प्रमुख पाहुणे श्री सुभाष चव्हाण साहेब व श्री पटणी लक्ष्मीकांत होते.
सर्वप्रथम श्री सुभाष चव्हाण साहेब यांचा सत्कार शाल, फेटा, बुके व तुळजाभवानीची प्रतिमा देऊन करण्यात आला. यानंतर श्री बालाजी इरुदे सर, प्रा. सुनील बहिरे सर, प्रा. डी. आर. साठे यांनी आपले मनोगत व्यक्त करुन चव्हाण साहेब यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य पाटील मॅडम यांनीही चव्हाण साहेब यांच्या कार्याचा गौरव केला.
सत्कार सोहळ्यानंतर श्री सुभाष चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन शिंदे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीकांत मोरे सर यांनी केले. या वेळी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.