
तुळजापूर-प्रतिनिधी
महाराष्ट्राची कुलस्वामिनीच्या श्रीक्षेत्र तुळजापूरात शनिवार दिनांक ५ आक्टोबर २०२४ रोजी रात्री ९ वाजता मुख्यमंत्री धर्मजागरण यात्रा दाखल झाली.पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेवरती महायुतीचे सरकार येवून एकनाथ शिंदेसाहेबांनाच मुख्यमंत्री पदी विराजमान व्हावेत असे आई तुळजा भवानी मातेस धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले व धाराशिव जिल्हा शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख तथा श्री तुळजा भवानी भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी घातले साकडे. ही धर्मजागरण यात्रा शासनाच्या विविध योजना संपुर्ण महाराष्ट्र भर फिरून जगजागृती करणार आहे.आयोध्या,प्रयागराज,
उज्जैन,वारानसी,तिरूपतीच्या धर्तीवरती तुळजापूरचा सर्वांगिण विकास व्हावा अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांची ही प्रखर इच्छा असल्याची तसेच त्यांच्याकडून लवकरच तुळजापुरच्या विकासासाठी निधी उपलब्ध केला जाईल अशी माहिती अक्षयजी महाराज भोसले यांनी यावेळी दिली.यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी डाॅ.सचिन ओंबासे,सह शिवसेनेचे धाराशिव जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम,धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे मराठवाडा समन्वयक विनोद सोंजी,अतुल मलबा,
सचिन कदम,युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख सुरज कोठावळे,संजय पप्पु मुंडे,खंडु कुंभार व स्वराज कदम हजर होते.