मंदिर संस्थांने नेमलेल्या बी व्ही जी कंपनीचा काळाबाजार झाकण्यासाठी नागेश शितोळे यांनी आमिष दाखवण्याचा प्रयत्न – अमोल जाधव

मंदिर संस्थांने नेमलेल्या बी व्ही जी कंपनीचा काळाबाजार झाकण्यासाठी नागेश शितोळे यांनी आमिष दाखवण्याचा प्रयत्न – अमोल जाधव
तुळजापूर : प्रतिनिधी
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांने नेमलेल्या बी व्ही जी कंपनी बाबत दि.०१/०९ /२०२४ रोजी अमोल जाधव हे जिल्हाधिकारी यांना भेटण्यासाठी कार्यालयात बसले असता नागेश शितोळे यांनी बी व्ही जी कंपनीच्या विरोधातले अर्ज माघारी घ्या असे म्हणत अमोल जाधव यांना आमिष दाखविण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी दि.४/१०/२०२४ रोजी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे
निवेदनात असे नमूद केले आहे की की, शिवसेनेचे अमोल जाधव हे दिनांक १/९/२०२४ रोजी मंदिर संस्थांनी नेमलेल्या बी व्ही जी कंपनी विषयी निवेदन देण्यास आलो होतो, जिल्हाधिकारी यांना भेटल्यानंतर त्याविषयी मला परत भेट देतो म्हणल्यानंतर जाधव हे बाहेर बसले होतो. तेव्हा नागेश नागेश शितोळे, त्यांनी काही बी व्ही जी कंपनीचे मध्यस्थी करण्यासाठी जाधव यांना पैशाचे अमिष दाखविले व जिल्हाधिकारी साहेबाचा मी जवळचा आहे, मला जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या खास कामासाठी हैद्राबादला पाठविले होते. मी सर्व अधिकारी, पुढारी यांच्या मजर्जीतला असून मी सांगेल तोच निर्णय मंदिरामध्ये होतील असे सांगून नागेश शितोळे यांनी वेळोवेळी जाधव यांना आर्थिक अमिष दाखविले हे कृत्य सिसिटीव्ही कॅमेरामध्ये कैद्य असून आपण तो सिसिटीव्ही कॅमेरा तपासून नागेश शितोळे यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी असा लेखी निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे या निवेदनावर अमोल जाधव (शिवसेना ) यांची स्वाक्षरी आहे.