विद्यमान आमदाराचे स्वयंसायकावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा – अमोल जाधव
विद्यमान आमदारांची हुकूमशाही

विद्यमान आमदाराचे स्वयंसायकावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा – अमोल जाधव
तुळजापूर : प्रतिनिधी
श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी
दि.२०/१०/२०२४ रोजी सकाळी ९.२५ वा मिनिटानी विद्यमान आमदार यांचे स्वयंसहायक अभिषेकाच्या वेळी व्ही आय पी देविच्या दर्शनासाठी मंदिरात घेऊन गेले असल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत दि.२१ ऑक्टंबर रोजी
अमोल शिवाजीराव जाधव, निष्ठावंत शिवसैनिक उध्दव ठाकरे गट रा. तुळजापूर यांनी मा. व्यवस्थापक तथा तहसिलदार श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर तुळजापूर यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात असे नमूद केले आहे की, दिनांक २०/१०/२०२४ रोजी सकाळी ९.२५ मिनिटानी विद्यमान आमदार यांचे स्वयंसायक यांनी अभिषेकाच्या वेळी श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी व्हीआयपी मंदिरात नेले तरी सद्यस्थितीत विधानसभा २४१ चे आदर्श आचारसंहिता लागू आहे, तरी आमदारांचे स्वयंसहाय्यक सुजित जमदाडे यांनी आचारसंहिताचे भंग केला असून त्यानी आपल्या व्हीआयपी रजिस्टरला नोंद न करता तसेच मंदिरात दर्शनासाठी घेवून गेले, तरी आचारसंहितेचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असा एका लेखी निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे.या निवेदनावर शिवसेनेचे अमोल जाधव यांची स्वाक्षरी आहे.