शिवसेना (शिंदे गट ) यांच्या वतीने महायुतीचे उमेदवार यांना जाहीरपणे प्रचारापासून बहिष्कार – अमरराजे कदम – परमेश्वर
पत्रकार ज्ञानेश्वर गवळी तुळजापूर

शिवसेना (शिंदे गट ) यांच्या वतीने महायुतीचे उमेदवार यांना जाहीरपणे प्रचारापासून बहिष्कार – अमरराजे कदम – परमेश्वर
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर येथे शिवसेना (शिंदे गट) यांनी तुळजापूर येथील छत्रपती एग्झिक्युटीव भक्त निवसास येथे दि.१७ एप्रिल रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषद येथे महायुतीचा उमेदवार अर्चनाताई पाटील यांना जाहीरपणे प्रचारापासून बहिष्कार टाकण्यात आला व्यसपीठावर जिल्ह्याचे सहसंपर्क अमरराजेकदम – परमेश्वर , उप जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर घोडके, तालुकाप्रमुख संभाजी पलंगे ,शहर प्रमुख बापूसाहेब भोसले , तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना म्हणाले की महायुती उमेदवार सौ अर्चनाताई पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अजून पर्यंत महायुतीचा घटक पक्ष असलेला महत्त्वाचा पक्ष शिवसेना या पक्षातील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नसून जोपर्यंत सन्मानाची तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री तानाजी सावंत यांचा आदेश येत नाही तोपर्यंत महायुतीचे उमेदवार चा प्रचार करणार नाही असे बोलताना सांगितले धाराशीची जागा ही परंपरागत शिवसेनेचे असून येथून तब्बल पाच वेळा शिवसेनेचा खासदार विजय झाले आहे मात्र यंदाच्या निवडणुकीत माहिती कडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेससाठी सुटली आहे त्यामुळे शिवसेना शिंदे गट यांचे ताकद जिल्ह्यासह तुळजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे मात्र उमेदवारी जाहीर झाल्यापासून उमेदवार तसेच तुळजापूरचे स्थानिक आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे विश्वसात घेत नसून विकास निधीच्या बाबतीत सुद्धा शिवसेनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नाही तुळजापूर शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला असून याबाबत देखील भाजपचे कार्यकर्ते तसेच नेते घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नाहीत जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांना यासंदर्भात कल्पना दिली असून ते सुद्धा नाराज असून प्रचारापासून अलिप्त आहेत त्यामुळे जोपर्यंत सन्मान जनक वागणूक तसेच वरिष्ठाचा आदेश येत नाही तोपर्यंत शिवसेना शिंदे गट प्रचारात सहभाग घेणार नाही असे जिल्ह्याचे सहसंपर्क अमर राजेकदम – परमेश्वर यांनी सांगितले यावेळी तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.