महायुतीच्या सौ.अर्चनाताई पाटील यांच्या प्राचारार्थ लोहारा येथे भाजपाची बुथ कार्नर बैठक संपन्न
Post-गणेश खबोले

लोहारा/प्रतिनिधी
उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभेच्या
भारतीय जनता पार्टी – शिवसेना-
– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-रिपाई-रासप- रयत क्रांती महायुतीच्या अधिकृत उमेदवार अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ भाजपाच्या वतीने लोहारा शहरातील भाजपाची
बुथ क्रं.85 ची कार्नर बैठक भाजपा तालुका सरचिटणीस तथा बुथ प्रमुख इकबाल मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली दि.17 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता मुल्ला यांच्या निवासस्थानी घेण्यात आली. यावेळी प्रमुख म्हणुन शिवसेनेच्या नगरसेविका तथा नगरपंचायतीच्या गटनेत्या सौ.सारिका प्रमोद बंगले, विजयकुमार लांडगे, जब्बार मुल्ला, दादा मुल्ला, महेबुब मुल्ला, जयश्री लांडगे, संगिता पाटील, सुवर्णा पाटील, मिराबाई गाडीलोहार, आरिफा मुल्ला, शमाबी मुल्ला, मालन शेख, लक्ष्मण रसाळ, आदम मुल्ला, खाशिम मुल्ला, रेश्मा मुल्ला, रेखा लांडगे, मिठु इंगळे, अदि उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडुन आ.ज्ञानराज चौगुले यांनी लोहारा शहरात मोठ्या प्रमाणात निधि उपलब्ध करुन विकास कामे मोठ्या प्रमाणात केली आहेत. आपल्या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने एक खंबीर नेतृत्व मिळाले आहे. यामुळे आपला देश सुरक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे जगात देशाची प्रतिष्ठा वाढली आहे. उद्योग, शिक्षण, आरोग्य किंवा देशाला सुरक्षा देण्याचा विषय असेल यामध्ये आपण अग्रेसर आहोत म्हणून मोदींजीना पंतप्रधान करण्यासाठी व राष्ट्रीय एकात्मतेला मदत करण्यासाठी देश हितासाठी आपण सर्व नागरिकांनी व महिलांनी महायुतीच्या उमेदवार सौ.अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठिमागे उभे राहुन त्यांना मदत करावे, असे अवाहान भाजपा तालुका सरचिटणीस तथा बुथप्रमुख इकबाल मुल्ला व शिवसेनेच्या गटनेत्या सौ. सारिका प्रमोद बंगले यांनी यावेळी केले. या कार्नर बैठकिस महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.