
धारशिव (प्रतिनिधी)
धारशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्हे उघडकीस आणणे बाबत पोलीस अधीक्षक संजय जाधव,अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुदर्शन कासार,पोलीस हवालदार शौकत पठाण,फहरान पठाण,चालक पोलीस अंमलदार-रत्नदिप डोंगरे,नितीन भोसले यांचे पथक मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढत कळंब उपविभाग गस्तीस असताना दि. 24.01.2025 रोजी पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, शिराढोण पोलीस ठाणे येथे गुरनं 10/2025 कलम 303 (2) मधील आरोपी नामे- बबलू फुलचंद पवार,रा. पिंपळगाव डोळा पारधीपिडी, ता. कळंब, जि. धाराशिव यांनी त्याचे साथीदारासह मंगरुळ शिवारातील सोयाबीन चोरले आहे. अशी खात्री लायक बातमी मिळाल्याने पथकाने नमुद ठिकाणी जावून शोध घेतला असता मिळालेल्या बातमी प्रमाणे नमुद वर्णनाचे इसम मिळून आला. पथकाने त्यास ताब्यात घेवून त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी प्रथमतः पोलीसेना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेउन विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले की, मी व माझे इतर साथीदार यांनी मिळून चोरी केल्याची कबुली दिली. त्यावर पथकाने आरोपी नामे बबलू फुलचंद पवार, दादा फुलचंद पवार दोघे रा. पिंपळगाव डोळा पारधीपिडी, ता. कळंब, जि. धाराशिव यांचा ताब्यात घेवून त्यांच्या ताब्यात असलेले 24.62 क्विंटल सोयाबीनचे 45 पोते एकूण 1,00,942 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन नमुद आरोपीस चोरीच्या मालासह शिराढोण पोलीसांच्या ताब्यात दिले. तसेच इरत आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक संजय जाधव,व गौहर हसन, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार,पोलीस हावलदार शौकत पठाण, फहरान पठाण,चालक पोलीस अमंलदार डोंगरे,भोसले यांच्या पथकाने केली आहे.