
उमरगा(रोहित गुरव)
परभणी येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रतिकृतीची मोडतोड करुन विटबंना करणार्यां दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तीचा शोध घेवून दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उमरगा तहसिलदार गोविंद येरमे यांना बौध्द समाज बांधवाच्या वतीने दि. 12 रोजी देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
संविधान हे समस्त भारतीयांचा आत्मा असून, सर्वांनी त्याचा सन्मान करने आद्यकर्तव्य आहे. असे असताना, परभणी येथे दि. 10 डिसेंबर रोजी दुष्ट प्रवृत्तीच्या माथेफिरु व्यक्तीने संविधानाच्या प्रतीकृतीची विटबंना केली असून या घटनेस कारणीभूत असलेल्या प्रवृत्तीच्या व्यक्ती विरोधात कडक कारवाई करुन, सदर प्रकरणाची सी.आय. डी. मार्फत चौकशी करण्यात यावी अन्यथा भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, होणा-या परिणामाम शासन व प्रशासन जबाबदार राहील.असा इशारा निवेदनामार्फत देण्यात आला आहे.
निवेदनावर , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे, सुभाष सोनकांबळे, माजी नगरसेवक दत्ता रोंगे, दिलीप भालेराव, अशोक बनसोडे, महेश माशाळकर, काँग्रेस जिल्हा सचिव विजय वाघमारे, धीरज बेळंबकर,ॲड. मल्हारी बनसोडे, ॲड. पांढरे,ॲड. सुरवसे,भंन्ते सुमंगल आदी मान्यवराच्या सहया आहेत.