न्यूज सिक्सर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

बाप रे! तुळजापूर तालुक्यात वडगाव लाख येथे पकडली १५० किलोची मगर; शेतकरी, ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निःश्वास

पत्रकार ज्ञानेश्वर गवळी तुळजापूर

बाप रे! तुळजापूर तालुक्यात वडगाव लाख येथे पकडली १५० किलोची मगर; शेतकरी, ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निःश्वास

तुळजापूर : संतोष दुधभाते

तुळजापूर तालुक्यातील वडगाव लाख येथील मारुती मंदिर देवस्थान जमिनीच्या विहिरीत १२ फूट लांब आणि १५० किलो वजनाची नर जातीची मगर आढळून आल्याने गावात भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. परंतु, वन्यजीव रक्षक सेवाभावी संस्था उदगीर
व सर्पमित्र उदगीर या सर्पमित्रांनी त्या मगरीस पकडण्यासाठी कसून प्रयत्न केले. तब्बल आठरा तासानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

तालुक्यातील वडगाव लाख येथील देवस्थानाच्या जमिनी शितात भली मोठी मगर दिसताक्षणी ते घाबरून केले. वन्यजीव रक्षक सेवाभावी संस्था उदगीर व सर्पमित्रांनी यांच्या मार्गदर्शानाखाली टीम तयार करण्यात आली.मगरीचे रेस्क्यू ऑपरेशन केले. सदरील मगर ही नर जातीची असून त्याचे वय अंदाजे १० ते ११ वर्ष आहे. या मगरीचे वजन १५० किलो असून लांबी १२ फूट इतकी आहे. ही मगर विशेष वाहनाने संभाजी नगर येथील रेस्क्यू सेंटरमध्ये पाठविण्यात आल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली. मगर पकडण्यास वन्यजीव रक्षक सेवाभावी संस्था उदगीर व सर्पमित्र उदगीर बाबा सय्यद , आशिष कल्लुरे , सिद्धर्थ काळे , काणा पांचाळ , फेरोज खादरी तसेच ग्रामस्थांच्या सहकारयीने रेस्क्यू करण्यात आली .

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे